लातूर पोलिसांची कर्तव्यत तत्परता. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे वाचविले प्राण.
मुख्य संपादिका महानंदा कासले

लातूर पोलिसांची कर्तव्यत तत्परता. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे वाचविले प्राण.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 24/09/2025 ते 25/09/2025 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लातूर पोलिसांच्या डायल 112 वर फोन आला की, एक मुलगी मौजे बुधोडा शिवारातील खदानीमधील पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत आहे अशी माहिती मिळाली. त्यावरून डायल 112 कक्षामधील पोलीस अधिकारी अंमलदारांनी विनाविलंब सदरची माहिती लातूर ग्रामीण व औसा पोलीस ठाण्याच्या पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांना कळविली.
पेट्रोलिंग वरील पोलीस अधिकारी व अंमलदारानी घटनेची संवेदनशीलता ओळखत काही मिनिटातच सदर ठिकाणी पोहोचले. त्यावेळी खदानीच्या पाण्यामध्ये एक तरुणी बुडत असताना आरडाओरडा करताना दिसून आली लागलीच पोलीस ठाणे औसाचे व पेट्रोलिंग वर असलेले पोउपनी अतुल डाके यांच्यासोबत असलेले पोलीस अंमलदार व होमगार्ड यांनी पाण्यामध्ये उडी टाकून बुडत असलेल्या तरुणीला पाण्याबाहेर काढले त्यामुळे त्या तरुणीचे प्राण वाचले आहे.
एकंदरीत आत्महत्या करीत असलेल्या तरुणीची माहिती मिळताच लातूर पोलिसांच्या डायल 112 तसेच पोलीस ठाणे लातूर ग्रामीण व पोलीस ठाणे औसा च्या येथील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी अतिशय तात्काळ व वेगवान हालचालीमुळे, तसेच तिन्ही शाखेचे आपसामधील उत्कृष्ट संपर्क व संवेदनशीलता यामुळेच आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राणपोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी डायल 112 कक्ष, पोलीस ठाणे औसा, पोलीस ठाणे ग्रामीण येथील कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे.