महाराष्ट्र

वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड विभागातर्फेएकदिवस शाळेसाठी” हा उपक्रम राबविण्यात आला

मुख्य संपादिका महानंदा

वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड विभागातर्फेएकदिवस शाळेसाठी” हा उपक्रम राबविण्यात आला

मा. पोलीस आयुक्त, कार्यालय पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील वाहतूक शाखेचे विभागामध्ये महिन्याचे पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी “एकदिवस शाळेसाठी” हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत वाहतूक शाखेच्या एकुष्ण १५ टिमच्या माध्यमातुन गुरूवारी १५ शाळांमध्ये जावुन विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमन, अपचात विषयी माहिती, व्यसनाधिनतेपासुन दूर राहणे, सायबर गुन्हेगारी, सोशल मिडियाचा वापर इत्यादी मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात येते.

आज दि. १८/०९/२०२५ रोजी वाहतूक शाखेमार्फत २२ व्या टप्प्यात एकूण १५ टिमचे माध्यमातुन, निवडलेल्या १५ शाळांमधुन सुमारे ३१५० विद्यार्थ्यांपर्यंत पोहचुन त्यांना पीपीटीद्वारे मुद्देसूद मार्गदर्शन केले. “एक दिवस शाळेसाठी” या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत एकुण २२ टप्प्यामध्ये ३७४ शाळांमध्ये जावून ९१८४६ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक च चांगला माणुस बनावे या दृष्टीकोनातून पिंपरी चिंचवड वाहतूक विभागामार्फत या प्रबोधनपर उपक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले आहे.

वरील उपक्रम मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड. मा. श्री. शशिकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विवेक पाटील, पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड यांचे संकल्पनेतून तसेच वाहतूक शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने आज दि. १८/०९/२०२५ रोजी यशस्वीरित्या पार पडला. उत्फुर्त प्रतिसाद मिळणाऱ्या या विद्यार्थीभिमुख उपक्रमाचा पुढील टप्पा गुरुवार, दि. ०२/१०/२०२५ रोजी पार पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!