शेतकरी बापाच्या मदतीला धावून आले पोलीस दलातील शेतकरी पुत्र, लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा बळीराजाला मदतीचा हात सर्व स्तरातून कौतुक
मुख्य संपादिका महानंदा

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 24/09/2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून राज्यात, विशेषतः मराठवाड्यात पावसानं शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना थोडासा मदतीचा हात मिळावा आणि आपणही समाजाचा एक घटक आहोत आपली समाजाशी बांधिलकी आहे. या जाणिवेतून लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था यांनी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून मदतीकरिता खारीचा वाटा उचलण्याचे ठरवले त्याचाच एक भाग म्हणून…
लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. लातूर यांच्या वतीने ₹1,11,111/- (एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये) इतकी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याकरिता धनादेश राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, पोलीस पतसंस्थेचे अध्यक्ष परमेश्वर ढेकणे, सचिव नामदेव सारोळे, गोविंद सरोदे, अयुब शेख, काझी, रवी कांबळे, माधव केंद्रे, श्रीमती दीपा शिवलकर व अनुराधा मेहकर हे हजर होते.