
अखेर श्वान “माया” ची प्राणज्योत मावळली
सोलापूर शहर पोलीस दलात जर्मन शेफर्ड जातीची असलेली श्वान माया हि दि.१२/१०/२०१५ रोजी बॉम्ब शोधक व नाशक पथकात दाखल झाली, ग्यान माया हिचे हस्तक म्हणून पोह/अमोल बांदल व पोह/सुधाकर जिङगीकर या माहितगार व अनुभवी पोलीस अंमलदार यांचे देखरेखीखाली श्वान माया हिला स्फोटके शोधण्याचे प्रशिक्षण पुणे येथे देण्यात आले. दि.०७/०९/२०१६ रोजी आपले प्रशिक्षण संपवून बॉम्ब शोधक व नाशक पथकात प्रत्यक्षात काम करु लागली.
बॉम्ब शोधक व नाशक पथकासोबत काम करत असताना श्वान माया हिला दैनंदिन गर्दीचे ठिकाणे, गर्गस्थळे, बेवारस बैंग व वाहनांची तपासणी करणे तसेच VVIP यांचे दौऱ्याचे बंदोबस्त, नागपूर हिवाळी अधिवेशन, पंढरपूर आषाढी वारी बंदोबस्त, तुळजापूर नवरात्रोत्सव बंदोबस्त, भिमा कोरेगांव बंदोबस्त, नंदूरबार, नांदेड येथील VVIP बंदोबस्त असे बाहेरील बंदोबस्त देखील केले आहेत.
१) दि.०८/१०/२०१८ रोजी मरिआई पोलीस चौकी येथे एका संशयित मिळाली असता त्या संशयित बॅगेस श्वान माया ने इंडिकेशन दिले. त्या बॅगेमध्ये सुमारे १८ नग नॉन इलेक्ट्रिक डेटोनेटर व दोन पेन्सिल सेल, तांब्याचे रिल, माचिस अशा वस्तू मिळून आल्या.
२) भिमा कोरेगाव बंदोबस्ता दरम्यान पार्किंगची तपासणी करत असताना एका ठिकाणी श्यान मायाने इंडिकेशन दिले. त्यावेळी त्या वस्तूची बारकाईने पाहणी केली असता ते स्मोकलेस बॉम्ब असल्याचे निदर्शनास आले.
आज दि. १९/०९/२०२५ रोजी सकाळी ०८.०० वा. चे सुमारास बॉम्ब शोधक व नाशक पथकातील श्वान नामे माया हिचे अल्पशा आजाराने निधन झाले असून तिने जगाचा निरोप घेतला आहे.
श्वान माया हि तिच्या बुद्धीमत्तेसाठी व सौम्य स्वभावासाठी ओळखली जात होती. संपूर्ण बीडीडीएस पथकातील ती एक प्रिय सदस्य होती, श्वान माया हिने पथकात दाखल झाल्यापासून ते आजतागायत मोलाचे योगदान दिले आहे. सोलापूर शहर पोलीस हे श्वान मायाच्या निःस्वार्थ सेवेचे आणि धैर्याचे आभार मानतात व तिथे योगदान तिच्या सहकाऱ्यांच्या कायम आठवणीत राहील.
श्वान माया हिचा अंत्यविधी पोलीस मुख्यालयातील पोलीस रुग्णालयासमोरील असलेल्या मोकळ्या जागेत सलामी देवून, शासकिय इतमामात करण्यात आला. श्वान मायाचे अंत्यविधीवेळी पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय, सोलापूर शहर मा.श्री. गौहर हसन सो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे/विशा, सोलापूर शहर मा. श्रीमती आश्विनी पाटील मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर मा.श्री. राजन माने, राखीव पोलीस निरीक्षक लक्ष्मण बारावकर, बी.डी. डी. एस. चे प्रभारी अधिकारी व आर्थिक गुन्हे शाखेचे पोसई प्रताप डोंगरे, गुन्हे व बीडीडीएस व्या श्वान पथकातील सर्व अंमलदार, बीडीडीएस कडील पोलीस अंमलदार हे उपस्थित होते.
सहा