क्राईम न्युज

गोडाऊन मधील एलईडी टीव्ही चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक. 02 लाख 40 हजार रुपयांच्या 06 टीव्ही जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मुख्य संपादिका महानंदा कासले

गोडाऊन मधील एलईडी टीव्ही चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक. 02 लाख 40 हजार रुपयांच्या 06 टीव्ही जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इलेक्ट्रॉनिक साहित्य असलेल्या गोडावूनचे नटबोल्ट काढून गोडावूनमधील 43 इंचीच्या सहा एलईडी टीव्ही चोरीला गेल्याची घटना घडली.

एकूण 2 लाख 40 हजारांचे साहित्य चोरीला

गेले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात 19 जून रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नमूद गुन्ह्याच्या समांतर तपास करीत असताना पथकाला माहिती मिळाली की, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इलेक्ट्रॉनिक साहित्य असलेल्या गोडावूनचे नटबोल्ट काढून गोडावूनमधील चोरलेल्या सहा एलईडी टीव्ही सह दोन सराईत गुन्हेगार लातूर ते बार्शी जाणाऱ्या रोडवरील ब्रिज च्या बाजूला असलेल्या एका भंगार दुकानात थांबलेले आहेत. अशी माहिती मिळाल्याने नमूद पथक तात्काळ सदर ठिकाणी पोहोचून दोन संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या एलईडी टीव्ही संदर्भात विचारपूस केली तेव्हा दोघांनी मिळून यांचे एमआयडीसी भागात इलेक्ट्रॉनिक साहित्याचे गोडावूनचे शटर उचकटून, नटबोल्टकाढून गोडावूनमधील सहा एलईडी टीव्ही चोरी केल्या चे कबूल केले. वरून त्यांच्या ताब्यातील चोरीस गेलेल्या सहा एलईडी टीव्ही किंमत दोन लाख 40 हजार रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी नामे

1) जलील बशीर शेख, वय 38 वर्ष, राहणार म्हाडा कॉलनी, बाभळगाव रोड, लातूर.

2) शंकर शिवाजी मोरे, वय 34 वर्ष, राहणार लक्ष्मी कॉलनी पाखर सांगवी लातूर.

यांना पुढील तपास कामी पोलीस ठाणे एमआयडीसी चे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप हे करीत आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे

मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार संजय कांबळे, योगेश गायकवाड, राजेश कंचे, तुळशिराम बरुरे, व्यंकटेश नीटुरे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!