लातुरातील कॉफी शॉप वर पोलीस ठाणे गांधी चौक व दामिनी पथकाची संयुक्त कारवाई, गुन्हा दाखल.
महानंदा कासले

लातुरातील कॉफी शॉप वर पोलीस ठाणे गांधी चौक व दामिनी पथकाची संयुक्त कारवाई, गुन्हा दाखल.
लातूरसह जिल्ह्यातील कॉफी शॉप आणि कॅफे बाबत पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार लातूर पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फतीने 20 जून 2023 रोजी कॉफी शॉप व कॅफे व्यवसायिकांसाठी एक नियमावली जाहीर केली होती. या नियमावलीची काही कॉफी शॉप, कॅफे कडून उल्लंघन होत असल्याचे समोर आले होते. त्यावर श्री. अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर यांनी कॉफी शॉप व कॅफे वर कारवाई करण्याचे आदेशित केले होते.
दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून दिनांक 9 सप्टेंबर रोजी मोती नगर, लातूर भागातील ए.एस. कॉफी शॉप ची तपासणी केली असता त्यामध्ये निमयबाह्य गोष्टींना चालना मिळेल, अशा प्रकारची बैठक व्यवस्था करण्यात आल्याचे आढळून आले.
तसेच जिल्हाधिकारी लातूर यांनी 20 जून 2023 रोजी कॉफी शॉप व कॅफे व्यवसायिकांसाठी एक नियमावली जाहीर केली होती. त्यामध्ये कॅफेमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा, पारदर्शक काचेचे दरवाजे असणे, स्पष्ट बैठक व्यवस्था, अंतर्गत बंदिस्त कंपार्टमेंट्सना मनाई, भेट नोंदवही ठेवणे आवश्यक,
ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन करणे इत्यादी सुचना नियमावलीनुसार जिल्हाधिकारी लातूरसुचना नियमावलीनुसार जिल्हाधिकारी लातूर यांनी दिलेल्या आहेत. उपरोक्त नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने ए.एस. कॉफी शॉपचे चालक आकाश बालाजी साळुंखे, राहणार सोमवंशी नगर, लातूर याचे विरुद्ध पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा क्रमांक 409/2025 कलम 223 भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई श्री. अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर यांचे आदेशान्वये श्री. मंगेश चव्हाण अपर पोलीस अधीक्षक तसेच समीरसिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड तसेच दामिनी पथकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख यांनी संयुक्तरित्या कार्यवाही केली. पोउपनि चित्ते, पोलीस अंमलदार गोविंद सरवदे, संतोष गिरी, अनिल कज्जेवाड, राहुल दरोडे, प्रवीण कोळसुरे, तसेच ग्राम महसूल अधिकारी आशिष चव्हाण यांनी केली आहे.