क्राईम न्युज

एकूण -१२,३१,०००/- रुपयेचा १०.३ तोळे सोन्याचे दागिने, दोन मोटर सायकल असा मुददेमाल हस्तगत

मुख्य संपादिका महानंदा कासले

एकूण -१२,३१,०००/- रुपयेचा १०.३ तोळे सोन्याचे दागिने, दोन मोटर सायकल असा मुददेमाल हस्तगत (सुपे अहिल्यानगर सोनसाखळी खेचताना महीलेचा रोडवर पडुन मुत्यु झालेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा उघड)

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हददीत चेन चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी चेन स्नॅचिग गुन्हयांना प्रतिबंध करुन सदर आरोपींना अटक करणेबाबत गुन्हे यांना सूचना दिलेल्या होत्या सदर सूचनांचे अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ३ कडील अधिकारी व अंमलदार पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीतील चेन चोरी गुन्हयांचे सर्व घटनास्थळी भेटी देवुन सदर घटनास्थळांचे सीसीटीव्ही तपासुन आरोपींना निष्पन्न केले. सदर आरोपींच्या मागावर गेले एक महीन्यापासुन युनिट ३ चे पथक होते. परंतु आरोपी है वारंवार राहण्याचीजागा बदलत असल्याने ते मिळुन येत नव्हते. पोलीस तपास पथकास मिळालेल्या गोपनिय बातमी नुसार दि.०६/०८/२०२५ रोजी आरोपी नामे १) अक्षय राज शेरावत वय २६ वर्षे रा. हिंगणगाव ता. हवेली जि.पुणे व २) रुथी बुध्दीमान नानवत वय २३ वर्षे रा. आष्टापुर फाटा ता. हवेली जि. पुणे यास तळेगाव दाभाडे येथून ताब्यात घेतले तसेच दिनांक ०८/०८/२०२५ रोजी आरोपी नामे ३) अरमान प्रल्हाद नानावत वय २६ वर्षे, रा. वढु खुर्द ता. हवेली जि.पुणे ४) सोनु फिरोज गुडदावत वय २० वर्षे, रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनाम्हाळुंगे इंगळे येथून ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल तपास केला असता आरोपींनी पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, अहिल्यानंगर हद्दीत चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याबाबत कबुली दिली आहे.

तसेच दि.२०/५/२०२५ रोजी सुपा, अहिल्यानगर येथे आरोपी अक्षय शेरावत व रुषी नानावत यांनी सोनसाखळी चोरी करीत असताना महिलेचा रोडवर पडुन मृत्यु झाला होता सदर बाबत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयातील आरोपी मिळुन येत नव्हते. सदर महत्वाचा गुन्हा गुन्हे शाखा युनिट ३ ने उघडकीस आणला आहे.

यातील आरोपीकडून सोने विकत घेणारा इसम खुशालसिंग जोधसिंग राव वय ४३ वर्षे रा. कृष्णकुंज अपार्टमेंट रूम नंबर १ अंबरनाथ वेस्ट जि. ठाणे यास दि.६/८/२०२५ रोजी अटक करण्यात आलेली आहे.

वरील नमुद ०४ आरोपींकडूनएकुण १२ चेन चोरीचे, ०१ सदोष मनुष्यवध, वाहनचोरी ०१, घरफोडी ०१ असे एकुण १५ गुन्हे उघडकीस आणुन एकुण १२,३१,०००/- रुपयेचा १०.३ तोळे सोन्याचे दागिने, दोन मोटर सायकल मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

पिंपरी चिंचवड हददीतील खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!