क्राईम न्युज

जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा.”

मुख्य संपादिका महानंदा कासले

जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा.”

मा.पोलीस अधीक्षक, धाराशिव श्रीमती शफकत आमना यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नॅशनल हायवे 52 जवळील भवानी चौक ते अहिल्यादेवी होळकर चौकाकडे जाणारे रोडलगत असलेल्या गाझी हटिलच्या बाजूला पत्राचे शेडमध्ये धाराशिव येथे काही इसम तिरट मटका नावाचे जुगार खेळत व खेळवीत आहे असे इसमांची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही कराणे बाबत आदेशीत केल्याने मा. पोलीस अधीक्षक कार्यालयाचे वाचक श्री हिंगोले, पोलीस हावलदार तांबे, शेख, लोखंडे, भोजगुडे व सोबत क्यु. आर.टी. पथक यांचे पथकाने नमुद ठिकाणी जावून 20.20 वा. सु. छापा टाकला असता तेथे काही इसम गोलाकार बसून तिरट मटका नावाचे जुगार खेळत असतांना मिळून आले. 1. सर्फराज मकसुद कुरेशी, 2. जुबेर जमील शेख, 3. श्रीकांत बाबासाहेब शिंदे, 4. पाशा कमाल पटेल, 5. अजमतुल्ला जब्बार शेख 6. अमोल प्रकाश देढे, 7. अमीर करीम सय्यद, 8. सागर मारुती भांडवले, 9. आबेद अब्दुल करीम शेख, 10. रविंद्र मैदाड सर्व रा. धाराशिव हे सर्व लोक तिरट मटका जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. नमुद इसम हे रोख रक्कम सह मोबाईल फोन, वाहने व जुगाराचे साहित्यासह असा एकुण 10,58,185 ₹ स्वतःचे कब्जात बाळगलेले असताना पथकास मिळून आले. यावरुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम- 4,5 अन्वये धाराशिव शहर पो. ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हिंगोले, पोलीस हावलदार तांबे, शेख, लोखंडे, भोजगुडे सोबत क्यु आर.टी. पथक यांचे पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!