
सासरचे लोकांचे त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या.
तक्रारदार इसम नामे देवेंद्र भाऊसाहेब खैरनार, वय २६ वर्षे, धंदा नोकरी, पत्ता- मु.पो. मोहाडी, प्र डांगरी, ता.धुळे, जि. धुळे. यांची जुळी बहिण मयत नामे दिव्या भाऊसाहेब खैरनार/सौ. दिव्या हर्षल सुर्यवंशी, वय २६ वर्षे, पत्ता डब्ल्यु ५७, वाकड, पुणे. हिने तिचे सासरचे लोकांनी तु घरातच असते, जॉब करुन पैसे कमवत नाही म्हणुन घालुन पाडुन बोलणे, घरातील सर्वांचा स्वयंपाक एकटीलाच बनवायला लावणे, सर्वांची भांडी घासायला लावणे, सर्व घराची फरशी पुसुन घ्यायला लावणे, घर आवरायला लावणे, थोडे जरी काही काम बाकी राहिले तर त्यावरुन वाईट-साईट बोलुन अपमान करणे, कोठेतरी नोकरी करुन पैसे कमविण्यासाठी छळ करुन, जावा-सॉफ्टवेअर संदर्भातील कोर्स करायला लावला, वाकडमध्ये घेतलेल्या नवीन फ्लॅटसठी लागणारे फर्निचरसाठी पैसे आणण्याकरीता तसेच लग्न झाल्यापासुन मुलबाळ झाले नाही म्हणुन तिचा छळ करुन, जास्तच प्रमाणात घरातील जास्त कामे सांगुन, सकाळी लवकर उठायला लावुन विनाकारण घराची स्वच्छता करायला लावणे, जास्तीचे कपडे परत धुवायला लावणे, सारखेच घालुन पाडुन बोलुन तिचा अपमान करणे असे करणारे तिचे पती १) हर्षल शांताराम सुर्यवंशी, वय ३३ वर्षे, रा. डब्ल्यु ५७. वाकड, पुणे. सासु २) कल्पना शांताराम सुर्यवंशी, वय ५५ वर्षे, अंदोज रा. सदर, सासरे ३) शांताराम उत्तम सुर्यवंशी, वय ६० वर्षे, अंदाजे ४) जेठ (मोठे दिर) योगेश शांताराम सुर्यवंशी वय ४० वर्षे अंदाजे रा. नवले ब्रिजजवळ, आंबेगाव बुद्रुक, पुणे. या सर्वांनी मिळुन, नणंद ५) जयश्री पवार यांनी तुला नोकरी लागत नाही. तु माहेराहुन फर्निचरसाठी पैसे आणत नाही आणि तुला लग्न झाल्यापासुन मुल-बाळ झाले नाही. या कारणावरुन तिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ करुन, मारहाण करुन, तिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिने काल दिनांक १८/०८/२०२५ रोजी दुपारी ०१/०० ते संध्याकाळी ०७/०० वा चे दरम्यान तिचे राहते घरी डब्ल्यु ५७, वाकड. पुणे. याठिकाणी तिस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे त्यांचे विरुद्ध वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन दाखल गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक, दिपाली मुंडकर हे करत आहेत. दाखल गुन्ह्यातील दोन आरोपी मयत महिलेचे पती हर्षल शांताराम सुर्यवंशी व सासरा शांताराम उत्तम सुर्यवंशी यांना गुन्हयात अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध चालु आहे.