अवैधरित्या गोवंशीव जनावराची वाहतुक करणारे इसमांना ताब्यात घेवुन, वाहणासह 08 गोवंशीय जातीचे जनावरे असा एकण पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण 8,22,000/- रु. चा मुद्देमाल जप्त
मुख्य संपादिका महानंदा कासले

नांदेड जिल्हयामध्ये अवैध मार्गाने गोवंशीय जनावराची वाहतुक होत असल्याने मा. श्री. ऑचनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब, नदिड यांनी श्री. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना अवैध मार्गाने गोवंशीय जनावराची वाहतुक करणा-यांवर कार्यवाही करण्याचे उयदेश दिले होते
त्या अनुषंगाने दिनांक 20/09/2025 रोजी मासरेड दरस्यान पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांची टिम उपविभाग इतवारा भागात पेट्रोलीग करीत असतांना टाघरबोर्ड कमान इतधारा नांदेड येथे आले असता त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अवेध गोवंश जातीचे जनावरे वाहतूक करणारी बोलोरो पिकअप वाहन क्रमांक MH 03-CV-4703 इकबालनगर पाण्याच्या टाकीजवळ आल्ताफ यांचे पत्राचे शेड समोर रोहबर नांदेड पांचलेली आहे. त्यामध्ये गोवंशीय जनावरे कोंबुन भरलेली असून काही जनावरे रोडवर बांधलेली आहेत अशी खात्रीशीर गोपनीय माहीती मिळाल्यावरुन सदरची माहीती श्री. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 21/09/2025 रोजी वेळ 09:00 वाजताचे सुमारास इक्रयालनगर पाण्याच्या टाकीजवळ आल्ताफ याचे पत्राचे शेड समोर रोडवर नदिड येथे छापा कार्यवाही करुन अवैध रित्या 08 गोवंशीय जनावरे किमती 3,22,000 रूपयाचे व वाहतुक करणारा बोलोरो पिकअप वाहन क्रमांक MH 03-CV-4703 किमती 3,00,000/- रुपयाचा असा एकुण 8,22,000/- रु. मुद्देमाल जप्त करुन सदर ठिकाणी मिळून आलेले आरोपी व मुद्देमाल पो.स्टे. नांदेड ग्रामीण यांचे ताब्यात देवून आरोपीतांवर नमूद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा.श्री अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदरची कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे फोतुक करुन अभिनंदन केले आहे.