मा. जिल्हाधिकारी आणि मा. पोलीस आयुक्त यांचे गणेशोत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरण्याचा बंदी आदेश कायम ठेवण्यात आला.”
मुख्य संपादिका महानंदा कासले

* मा. जिल्हाधिकारी आणि मा. पोलीस आयुक्त यांचे गणेशोत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरण्याचा बंदी आदेश कायम ठेवण्यात आला.”
मा. पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करून दिनांक 01/09/2025 रोजीपासून ते दिनांक 07/09/2025 रोजीचे 24.00 वा.पर्यंत पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्दीमध्ये, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि ईद-ए मिलाद कमिटी यांचेकडून आयोजीत मिरवणूकांमध्ये, डॉल्बी सिस्टीमचा वापर करणेस दिनांक 01/09/2025 रोजीच्या आदेशान्वये, प्रतिबंध आदेश निर्गमित करून त्याबाबत जाहीर प्रसिध्दी केलेली होती. त्याचप्रमाणे मा. जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी देखील संपुर्ण सोलापूर जिल्हयात नमूद कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास बंदी आदेश जारी केलेले आहेत.
नमूद बंदी आदेशाविरुध्द अॅड. श्री. योगेश नागनाथ पवार यांनी मा. 5 वे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, तथा अति.मु.न्या. सोलापूर दक्षिण, सोलापूर यांचे न्यायालयात नियमित दिवाणी दावा क्रमांक 986/2025 नुसार दावा दाखल केलेला होता.
या दाव्याच्या अनुषंगाने, मा. पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार आज दि.04/09/2025 रोजी पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर यांच्याकडुन सविस्तर लेखी म्हणणे सादर केलेले होते. त्यावर सरकार पक्षाच्या वतीने अॅड. श्री. प्रदीपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील, सोलापूर यांनी मा. जिल्हाधिकारी आणि मा. पोलीस आयुक्त यांनी डॉल्बी सिस्टीम बंदीबाबत निर्गमित आदेश अचुक व संयुक्तीक असलेबाबत मा. न्यायालयात परीपुर्ण व जोरदार युक्तीवाद करून केला. त्यावर मा. न्यायालयाने सरकार पक्षाचे म्हणणे आणि युक्तीवाद ग्राह्य धरून डॉल्बी सिस्टीमवर घालण्यात आलेली बंदी कायम ठेवली आहे.