भूम पंचायत समिती कर्मचान्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात.” पैशाच्या मोबदल्यात केला होता हल्ला
मुख्य संपादिका महानंदा कासले

भूम पंचायत समिती कर्मचान्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात.” पैशाच्या मोबदल्यात केला होता हल्ला.”
दि09/09/2025 रोजी सायंकाळी 05.00 वाजणेच्या सुमारास मौजे ईट शिवारातील ईट ते जातेगाव जाणारे रोडवर किनारा हॉटेलचे जवळ श्रीकृष्ण अर्जुन बांगर वय 39 वर्ष व्यवसाय नोकरी रा. पाटोदा ता. पाटोदा जि. बीड व त्यांचे सहकारी रविन्द्र राख त्यांचे बोलेरो गाडी मध्ये जात असताना गाडी थांबवण्यास सांगुन अनोळखी चार इसमांनी जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करून जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी जबाबावरून पो.स्टे. वाशी गु.र.न. 290/2025 कलम 109 (1), 115 (2), 118 (1) 351(3), 3 (5) भा. न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्रीमती, रितू खोकर मॅडम यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर गुन्ह्याचा तपास करून नमूद गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांना गोपनीय माहितीदाराकडून यातील संशयित आरोपी बाबत माहिती मिळाली. त्यांनी आरोपी नामे सलमान पठाण, रा. भूम व रितेश अंधारे, रा. हाडोंगरी यांना येरमाळा उड्डाणपुलाच्या खालून ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्ह्या संदर्भात अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन त्यांचे अन्य साथीदारांची माहिती दिली. तसेच पैशाच्या मोबदल्यात सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. त्यावरून वर नमूद दोन आरोपींना वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे वाशी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन कासार, पोलीस हावलदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, दयानंद गादेकर, चालक पोलीस अंमलदार नागनाथ गुरव, रत्नदीप डोंगरे, प्रकाश बोईनवाड यांचे पथकाने केली आहे.