अशोक दशरथ सामल सोलापूर व धाराशीव जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार
मुख्य संपादिका महानंदा कासले

अशोक दशरथ सामल सोलापूर व धाराशीव जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार
इसम नामे, अशोक दशरथ सामल, वय-४६ वर्षे, रा. १४/१३४, गांधी नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर याचेविरुध्द सन २०१४, २०१५, २०१९, २०२० व सन २०२५ या कालावधीमध्ये सामान्य नागरीकांना दमदाटी व मारहाण करुन दहशत निर्माण करणे, साथीदारांसह घातक शस्त्र जवळ बाळगून मारहाण करणे, साथीदारांसह गोरगरीब जनतेला दमदाटी करुन अडवणुक करुन पैशांची मागणी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (4) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने श्री विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन त्यांचेकडील तडीपार आदेश क्र.२१७९/२०२५ दि.२२/०८/२०२५ अन्वये, इसम नामे, अशोक दशरथ सामल, वय-४६ वर्षे, रा. १४/१३४, गांधी नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर विजापूर येथे सोडण्यात आले आहे.