गावठी कट्टा बाळगणारा युवक ताब्यात. एक गावठी कट्टा हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
मुख्य संपादिका महानंदा कासले

गावठी कट्टा बाळगणारा युवक ताब्यात. एक गावठी कट्टा हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कार्यवाही करण्यात येत होती.
पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती खरी असल्याचे निष्पन्न होताच दिनांक 18/09/2025 रोजी दुपारी लातूर च्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून एका युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा (पिस्टल) हस्तगत करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर
1) चंद्रकांत हरिबा शिंदे, वय 26 वर्ष, राहणार गांजरखेडा, तालुका औसा जिल्हा लातूर.
यास 50 हजार रुपये किमतीच्या गावठी कट्ट्यासह ताब्यात घेण्यात आले असून पोलीस ठाणे गांधी चौक येथे भारतीय हत्यार कायदाअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथका मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, सफौ/सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार गोविंद भोसले, राजेश कंचे, विनोद चलवाड, चंद्रकांत डांगे, प्रशांत स्वामी, महादेव शिंदे, तुळशीराम बरुरे, बंडू नीटुरे यांनी केली आहे