सेवानिवृत्त 5 अधिकारी- अंमलदारांचा निरोप समारंभ पोलीस अधिक्षक कार्यालयात संपन्न.”
मुख्यसंपदिका महानंदा कासले

महाराष्ट्र
“सेवानिवृत्त 5 अधिकारी- अंमलदारांचा निरोप समारंभ पोलीस अधिक्षक कार्यालयात संपन्न.”
पोलीस अधिक्षक कार्यालय सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांचा निरोप समारंभ हा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे महिना अखेरीस नियमीतपणे आयोजित केला जातो. धाराशिव शहर पोलीस दलातील अधिकारी- पोलीस श्रेणी पोलीस उप निरीक्षक श्री. मधुकर काशिनाथ घायाळ, पोलीस सहाय्यक फौजदार श्री. बिभीषण भगवान लोंढे, राजेंद्र मोहनराव राऊत, उमाकांत लक्ष्मणराव माळाळे, पोलीस हावलदार-उल्हास दगडु वाघचौरे या 05 व्यक्तींचा सेवानिवृत्त निरोप समारंभ आज दि. 31.07.2025 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय सभागृहात मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. निरोप समारंभादरम्यान मा.अपर पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच कार्यक्रमास सेवानिवृत्त अधिकारी अंमलदार हे कुटूंबीयांसह उपस्थित होते. समारंभादरम्यान नोकरीतील अनुभव कथन करताना सेवानिवृत्त अधिकारी अंमलदार यांचे डोळे पानावले. यावेळी पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड व अधिकारी अंमलदार उपस्थित होते.
जनसंपर्क