
बेकायदेशीर रेती वाळू उपसा करणार आरोपीला अटक
01) एक हिरव्या पिवळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक MH-26-CE-2392 किंमती अंदाजे 10,00,000/- रुपये,, 02) अंदाजे काळी रेती (वाळु) 01 ब्रास प्रति व्रास किंमती 4,000/- रुपये असा एकुण 10,04,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त
मा. श्री. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस स्टेशन हदित ऑपरेशन प्लश आऊट अंतर्गत अवैधरित्या गौण खनीज (रेती) उपसा व वाहतुक करणारे लोकांवर कारवाई करणे वावत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने राजू चव्हाण सहा. पोलीस निरिक्षक पो.स्टे. मुक्रमाबाद यांनी पोकों-346 गजानन मारोती ढगे, पोकों-612
जावेदखों गुलावखों पठाण व दोन होमगार्ड असे पो.स्टे. हदित पेट्रोलिंग करीत असतांना दिनांक 16.08.2025 रोजी 18.15 वा. मौजे आंबुलगा वु गावातील सार्वजनिक पाण्याचे टाकीजवळ रोडवर यातील आरोपी चालक नामे माधव व्यंकट कांबळे वय 20 वर्ष व्यवसाय ट्रॅक्टर चालक रा. आंबुलगा वु ता. मुखेड जि. नांदेड हा त्याचे ताव्यातील एक हिरव्या पिवळया रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक MH-26-CB-2392 ज्यामध्ये विनापरवाना अवैध रित्या काळी रेतीची (वाळु) उपसा करुन तिची वाहतुक करीत असतांना मिळून आलेने सदर आरोपीचे ताब्यातुन एक हिरव्या पिवळया रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक MH-26-CE-2392 किंमती 10,00,000/- रुपये व काळी रेती (वाळ) 01 ब्रास प्रति ब्रास किंमती 4,000/- रुपये असा एकुण 10,04,000/- रुपयाचा मुद्येमाल दोन पंचासमक्ष सविस्तर जप्ती पंचनामा करून मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द कलम 303(2) BNS सह कलम 48 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगीरीचे मा. श्री. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.