अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपींना धाराशिव जिल्ह्यातून अटक. बालकाची सुखरूप सुटका. पोलीस ठाणे कासारसिरसी ची कारवाई.
मुख्य संपादिका महानंदा कासले

अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपींना धाराशिव जिल्ह्यातून अटक. बालकाची सुखरूप सुटका. पोलीस ठाणे कासारसिरसी ची कारवाई.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीने पोलीस ठाणे कासारसिरसी ला येऊन तक्रार दिली की, दिनांक 14/08/2025 रोजी सकाळी 09.00 वा. त्याच्या अल्पवयीन मुलास निलंगा ते कासारसिरसी रोडवर करीबस्वेश्वर विदयालय समोरुन इसम नामे
1) सुरेश सिताराम बंडगर,
2) अजय तानाजी सुर्यवंशी,
3) एक अल्पवयीन मुलगा सर्व रा. कासारसिरसी ता. निलंगा यांनी अपहरण करुन कार मधून घेऊन गेले आहेत.
त्यावरून पोलीस ठाणे कासारसिरसी गुन्हा रजिस्टर नंबर 175/2025 कलम 137 (3), 3 (5) भा.न्या.सं. प्रमाणे वर नमूद आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा विशाल धुमे यांनी सदर गुन्ह्यातील अपहरण झालेल्या बालकाचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले होते. त्यावरून पोलीस ठाणे कासार सिरसी चे सहा. पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड व पोलीस अमलदारांचे पथक तयार करुन आरोपीतांचा पुणे, सोलापुर, कल्याण जि. ठाणे येथे शोध घेतला असता ते वारंवार आपलेठिकाण बदलत असल्याने व अपहृत पिडीत बालक त्याचे सोबत असल्याने व आरोपीचा पूर्व इतीहास वारंवार गुन्हे करण्याचे सवईचे सराईत गुन्हेगार असल्याने नमूद आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन बालकाची सुखरूप सुटका करणे महत्वाचे होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी तपासाचे चक्रे फिरवुन शर्तीचे प्रयत्न करुन आरोपीतांचे सायबर पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांचे सहकार्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांच्या पथकाने शिताफीने उमरगा जि. धाराशिव येथुन दिनांक 17/08/2025 रोजी सकाळी 06.00 वा आरोपी सुरेश बंडगर यास ताब्यात घेवुन पिडीत बालकाची त्याचे ताब्यातुन सुटका केली. तसेच त्याच्या सोबत असलेले इतर दोन साथीदार हे घटनास्थळावरून पळून गेले होते त्यांनाहीकासारसिरसी येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीकडे तपास केला असता यातील आरोपी सुरेश बंडगर याचे पत्नीला पिडीत बालकाच्या भावाने पळवुन नेल्याने सुडबुद्धीने, अविचारी व व्देषापोटी पिडीतास पळवून नेल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलीसांनी गुन्हयात वापरलेले वाहन कार क्र. एम.एच. 14 के.ए. 021 ही जप्त केले असुन पुढील तपास सुरु आहे.सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस पथकातील सहा. पोलीस निरीक्षक, प्रवीण राठोड, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर, पोलीस अमलदार तपसे, वरवटे, गायकवाड, नागमोडे, मस्के, डावरगावे, चव्हाण, शैलेश सुडे यांनी केली आहे