क्राईम न्युज

हडपसर तपास पथकाकडून चैन स्नॅचींगचे ५ गुन्हे उघड अटकेतील आरोपीकडून किं. रू ०७,०४,०००/- चा मुद्देमाल हस्तगत “

मुख्य संपादिका महानंदा कसले

हडपसर तपास पथकाकडून चैन स्नॅचींगचे ५ गुन्हे उघड अटकेतील आरोपीकडून किं. रू ०७,०४,०००/- चा मुद्देमाल हस्तगत “

गेल्या काही महिन्यांपासून हडपसर व आसपासच्या परिसरात चैनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. विशेषतः संध्याकाळी महिलांना लक्ष करून गदिच्या ठिकाणी चैनचोरी करण्यात येत होती. या वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी आढावा बैठकीमध्ये अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांनी देखील हडपसर पोलीस ठाण्यात बैठक घेवून संबधित अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.

या सूचनांनुसार संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), अश्विनी जगताप, पोनि. (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक अधिकारी / अंमलदार यांनी गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास केला. तपासातून असे दिसून आले की, चैन स्नॅचिंगचे गुन्हे हे रात्री १९.३० ते २१.३० वा.चे दरम्यान पुणे सोलापूर रोडवरील गर्दीच्या ठिकाणी जसे शेवाळवाडी येथील भाजी मार्केट, महादेव मंदिर, गाडीतळ, हडपसर, मांजरी येथील गदर्दीच्या ठिकाणे झाले असल्याचे दिसून आले. नमुद परिसरात खरेदीसाठी विशेषतः महिलांची गर्दी असते. तसेच गुन्हा झाल्यानंतर पुणे सोलापूर हायवेने पसार होण्याची सोय असल्याने आरोपींना हा भाग निवडल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार आराखडा तयार करून दिनांक १८/०८/२०२५ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार महावीर लोंढे, माधय हिरवे, यांचे पथक पोलीस स्टेशन हद्दीत गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार महावीर लोंढे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून आरोपी नामे १) अनिकेत विजय चव्हाण वय-२४ वर्षे रा.मुळ रा.डी. खुणेश्वर ता. मोहोळ जि.सोलापुर सध्या रा.ठि. सज्जनगड कामधेनु इस्टेट हडपसर गाव पुणे २) ज्ञानेश्वर मिकाजी चव्हाण चय-२३ वर्षे रा.डी. खुणेश्वर ता. मोहोळ जि. सोलापूर यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे केले कौशल्यपूर्ण च सखोल तपासात त्यांनी वेळोवेळी हडपसर परिसरात चैनचौरी केली असल्याची कबुली दिली. नमुद आरोपी यांना हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ५११/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४(२), ३(५) या गुन्ह्यात अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. अटक दोन्ही आरोपी यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून त्यांचेकडे केले तपासात त्यांचेकडून ५ चैनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून ते पुढीलप्रमाणे…

१) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ४५६/२०२५ भा. न्या.सं. कलम ३०४(२), ३(५)

२) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ४९४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९(६), ३(५)

३) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ४९८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४(२), ३(५)

४) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ५११/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४(२), ३(५)

५) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ६५९/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४(२), ३(५)

आरोपींकडून आज रोजी पर्यंत ४५.५४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किं. रु ४,५४,०००/- चे, गुन्हा करताना वापर केलेल्या होंडा यूनिकॉर्न, हिरो एक्सट्रीम, बनावट नंबर प्लेट, स्क्रू ड्रायवर, मास्क, काळ्या रंगाची सेंक असा किं. रु ७,०४,६००/- चा माल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास सत्यवान गेंड, पोलीस उप निरीक्षक हे करीत आहेत

दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी ज्ञानेश्वर भिकाजी चव्हाण याच्यावर यापूर्वी हडपसर, वानवडी, सिंहगड, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ, समर्थ पोलीस ठाण्यात चैन स्नॅचीगचे १६ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), अश्विनी जगताप, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, भगवान हंबडे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महाविर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे, यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!