विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 07 लाख 04 हजार रुपयाचा वाहनासह दारूचा मुद्देमाल जप्त. गांधी चौक पोलीस ठाण्याची कारवाई.
मुख्य संपादिका महानंदा कसले

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर समिरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वातील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर गुळ मार्केट ते गांधी चौक जाणारे रोडवर सापळा लावून विदेशी दारूची चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी अवैध वाहतूक करीत असलेल्या वाहनाला विदेशी दारूच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमा विरुद्ध पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 02/09/2025 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास एक ग्रे रंगाची ब्रेझा कार क्रमांक एम.एच. 24 ए.एस.5365 या वाहनातून विदेशी दारूची अवैध वाहतूक होणारवाहनातून विदेशी दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने बेकायेशीररित्या अवैधपणे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे 54 हजार 490 रुपयाची विदेशी दारू व 6.5 लाख रुपये किमतीची नमूद कार मिळून आली. विदेशी दारूची अवैध वाहतूक करीत असलेला इसम नामे
1) अमर जयराम बिराजदार, वय 33 वर्ष राहणार गव्हाण तालुका निलंगा जिल्हा लातूर. सध्या राहणार याकतपूर रोड, सिंहगड सोसायटी लातूर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार गोविंद सरवदे, अनिल कज्जेवाड, राहुल दरोडे, संतोष गिरी, शिवा भाडुळे यांनी केली आहे.