देशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 06 लाख 32 हजार रुपयाचा वाहनासह दारूचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
मुख्य संपादिका महानंदा कासले

देशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 06 लाख 32 हजार रुपयाचा वाहनासह दारूचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळी ते तांदूळवाडी जाणारे रोडवर सापळा लावून देशी दारूची चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी अवैध वाहतूक करीत असलेल्या वाहनाला दारूच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमा विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 26/07/2025 रोजी टाकळी ते तांदुळवाडी रोडणे टाटा सुमो कार क्रमांक एम.एच. 23 ए.डी.0527 या वाहनातून देशी दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेकायेशीररित्या अवैधपणे देशी दारूचीगोपनीय माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेकायेशीररित्या अवैधपणे देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेऊन 01 लाख 32 हजार रुपयाची देशी दारू व 05 लाख रुपये किमतीची सुमो कार मिळून आली. देशी दारूची अवैध वाहतूक करीत असताना मिळून आलेला इसम नामे
1) विकास प्रकाश गायकवाड वय 29 वर्ष राहणार टाकळी (बु) तालुका जिल्हा लातूर. यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वातील पथकामधील सफौ सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, मनोज खोसे यांनी केली आहे.
पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
* जुगार विरोधी कारवाई.”
तामलवाडी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान तामलवाडी पोलीसांनी दि. 27.07.2025 रोजी 13.30 वा. सु. तामलवाडी पो ठाणे हद्दीत प्रशांत चौगुले यांच्या गॅरेजच्या पाठीमागे पिंपळा बु येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-पप्पु हसन शेख, वय 38 वर्षे, महादेव सुर्यभान पाटील, वय 44 वर्षे, हुसेन मुबारक तांबोळी, वय 45 वर्षे, प्रशांत शशीकांत चौगुले, वय 25 वर्षे, रा. पिंपळा बु. ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 13.30 वा. सु. प्रशांत चौगुले यांच्या गॅरेजच्या पाठीमागे पिंपळा बु येथे तिरट मटका जुगाराचे साहित्य एकुण 1,830 ₹ रक्कम स्वतःचे कब्जात बाळगलेले तामलवाडी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.