सदर बझार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटिकरण पथकाकडून मोटार सायकल चोराकडून एकूण 11 मोटार सायकल चोरींच्या गुन्ह्याची उकल होऊन त्यामध्ये एकूण 2,31,400 /- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
मुख्य संपादिका महानंदा का सले

सदर बझार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटिकरण पथकाकडून मोटार सायकल चोराकडून एकूण 11 मोटार सायकल चोरींच्या गुन्ह्याची उकल होऊन त्यामध्ये एकूण 2,31,400 /- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
सदर बझार पोलीस ठाणे येथे गेले काही दिवसापासून मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये सतत वाढ होत होती. त्या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळी पथके तयार करुन पाळत ठेवण्यात येत होती.
दि.31/07/2025 रोजी रात्री 11.30 वा ते दि.01/08/2025 रोजीचे सकाळी 07.00 वा च्या दरम्यान घर नं.298 दक्षिण सदर बझार बेरीया हॉलच्या समोर, सोलापूर येथे पार्क केलेली फिर्यादी यांच्या मालकीची हिरो पेंशन प्रो कंपनीची मोटार सायकल क्र. MH13DF7304 ही हॅन्डल लॉक करुन पार्क करुन ठेवली असता ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने हॅन्डल लॉक तोडुन लबाडीच्या इराद्याने चोरुन नेली आहे. वगैरे मजकुराची फिर्याद दिनांक 06/08/2025 रोजी फिर्यादी यांनी दिल्याने गु.र.नं. 642/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 3(5) अन्वये सदर बझार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन गुन्हे प्रगटीकरण पथकातील विविध पथके तयार करण्यात आले त्यानुसार सदर बझार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सपोनि सागर काटे व त्यांचे पथक गस्त घालत आसताना दि.06/08/2025 रोजी पोअं/ विशाल बोराडे व पोअं/ हणमंत पुजारी यांना एक संशयीत इसम हरीभाई प्रशालेचे मागील बाजुस संशयीत रित्या फिरत असल्याची माहिती मिळालेने सदर ठिकाणी जाऊन मोटार सायकल चोरीच्या अनुषंगाने गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या हिरो फॅशन मोटार सायकल क्रमांक MH-13 DF 7304 वर एक इसम संशयीतरित्या फिरत असताना दिसुन आल्याने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले व त्याचे नाव गांव बाबत विचारणा केली असता त्याने त्याचे नाव – साहिल महेबूब शहापूरे वय-22 रा. 333 दक्षिण सदर बझार, अशोक नगर, मुर्गी नाला जवळ, सोलापूर असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे त्याच्या ताब्यात असलेल्या मोटार सायकल बाबत तसेच कागदपत्राबाबत विचारणा करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदरची मोटार सायकल ही चोरीची असल्याचा दाट संशय आल्याने सदर इसमास मोटार सायकल सह पोलीस ठाणे येथे आणुन त्याच्याकडे चौकशी करता सदरची मोटार सायकल ही चोरी केल्याचे त्याने सांगीतल्याने दोन पंचासमक्ष पंचनामा करुन वर नमूद मोटार सायकल उपरोक्त गुन्हयात तपासीक अंमलदार पोह/सागर सरतापे यांनी जप्त केलेली आहे.
आरोपीत नामे – साहिल महिबूब शहापूरे यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे कौशल्याने तपास केला असता त्याने खालील नमुद वर्णनाच्या एकूण 11 मोटार सायकली वेगवेगळ्या ठिकाणावरुन चोरी केल्याचे कबुली दिली असुन त्यापैकी 08 मोटार सायकली या चालु स्थितीत तसेच 03 मोटार सायकली या तोडून त्याचे पार्ट वेगवेगळे केल्याचे सांगीतले. आरोपीत याचेकडुन चोरी केलेल्या चालु स्थितीतील 08 मोटार सायकली तसेच 03 मोटार सायकलीचे क्रप केलेले वेगवेगळे पार्ट, पंचनाम्या अंतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.
उपरोक्तप्रमाणे चोरीस गेलेल्या 11 मोटार सायकल पैकी 1) सदर बझार पो. ठाणे कडील 06 गुन्हे, 02) एमआयडीसी पो. ठाणे कडील- 02, 03) फौजदार चावडी पो. ठाणे कडील 01 गुन्हा 04) जेलरोड पो