नगदी रुपये 4300/- व दोन मोटार सायकल प्रत्येकी किंमत 50,000/- असा एकुण 1,04,300/-/ रूपयाचा मुद्देमाल.
मुख्य संपादिका महानंदा कासले

नगदी रुपये 4300/- व दोन मोटार सायकल प्रत्येकी किंमत 50,000/- असा एकुण 1,04,300/-/ रूपयाचा मुद्देमाल.
थोडक्यात हकिगत
मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अवैध धंद्यांवर “ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत कार्यवाही करणे बाबत सपोनि श्री. विलास चवळी, पोलीस स्टेशन मनाठा यांना आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने दिनांक 12/08/2025 रोजी पोलीस स्टेशन, मनाठा येथील पोलीस उप निरीक्षक श्री आशिष बोराटे यांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की, मौजे पिंपरखेड, तालुका हदगाव येथे काही इसम अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत आहेत. मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन नमुद ठिकाणी सदरचे पथक गेले असता निरंजन वाकोडे यांच्या शेड मध्ये स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या अंदर-बाहर नावाचा जुगार हार-जित वर खेळत व खेळवित असतांना वरील सहा आरोपी मिळुन आले. नमुद आरोपींकडून नगदी रुपये व दोन मोटार सायकल असा एकुण 1,04,300/- रूपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने मुद्देमाल जप्त करुन वरील नमुद आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे मनाठा येथील नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ठ