क्राईम न्युज

अन्न व औषध प्रशासन व नांदेड पोलीसांचे विशेष पथक यांची संयुक्तरित्या नशेली औषधी गोळ्या (Tablet) विक्री करणारे यांचे विरुध्द कडक कारवाई”

मुख्य संपादिका महानंदा कासले

अन्न व औषध प्रशासन व नांदेड पोलीसांचे विशेष पथक यांची संयुक्तरित्या नशेली औषधी गोळ्या (Tablet) विक्री करणारे यांचे विरुध्द कडक कारवाई”

नशेच्या आहारी जात असलेली नवीन पिढी व त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी या बाबतचे गांभिर्य लक्षात घेवून यावर प्रभावीपणे चाप लावण्याच्या दृष्टीकोणातून मा. अबिनाश कुमार साहेब, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी दिनांक 3/07/2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी तसेच मेडीकल मालक, FDA असीस्टंट कमिशनर यांची संयूक्त बैठक घेवून नशेली औषधी गोळ्या (Tablet) मेडीकलमध्ये विक्री न करण्यासबंधाने सक्त सूचना दिल्या, त्याचबरोबर नशेली पदार्थाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर अन्न व औषध प्रशासन देखील कायदेशिर कार्यवाही करीत असून त्यासबंधाने सबंधीत विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांना सूचना देण्यात आले.

दिनांक 23/06/2025 पासूनच या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून त्यामध्ये 1) श्री पंकज इंगळे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस स्टेशन इतवारा, मोबाईल क्र.7972837836 नांदेड. 2) श्री दिपासिंग नेहल, पोहेकों/1040 पोलीस स्टेशन हिमायतनगर जि. नांदेड 3) श्री रुपेश दासरवार, पोहेकों/686 शहर वाहतूक शाखा, इतवारा, नांदेड 4) श्री प्रदिप खानसोळे, पोहेकॉ/1742 पोलीस स्टेशन वजिराबाद, नांदेड 5) श्री जसपालसिंघ कालो, पोना/2162 पोलीस स्टेशन शिवाजीनगर, नांदेड यांचा समावेश आहे. सदर पोलीस पथके हे नांदेड शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक मेडीकलवर, 24×7 मेडीकल शॉप, Drug Medicine Supply Chain, Prescription Medicine चा गैरवापर करणा-यावर पोलीस प्रशासन, FDA, केमिस्ट असोसिएशन यांच्याशी समन्वये साधुन कार्यवाही करण्यासाठी लक्ष ठेवून आहेत. नशेली औषधी गोळ्या (Tablet) मेडीकलमध्ये विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची गंभिर दखल घेवून कठोर कायदेशिर कार्यवाही करण्यात येत आहे.

यापुर्वी पोलीस विभागाने देखील पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीत डोडा या अंमली पदार्थ बाळगणा-यांवर कारवाई केली आहे. यावर्षी माहे जानेवारी ते एप्रिल दरम्यान N.D.P.S.Act प्रमाणे 07 कार्यवाही करण्यात आल्या आहेत. माहे में 2025 मध्ये स्पेशल ड्राईव्ह घेवून या एका महिन्यामध्येच 08 कार्यवाही केली असून त्यामध्ये नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एका कार्यवाहीचा समावेश आहे. माहे जून 2025 मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने एका कार्यवाहीत 182 किलो गांजा जप्त केला आहे.

त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन व विशेष पोलीस पथक क्रमांक 01 मधील पोउपनि/पंकज इंगळे यांनी 25 जुन रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हदीत 03 ठिकाणी डोडा या अंमली पदार्थांवर कार्यवाही केली असून दिनांक 03.07.2025 रोजी विशाल मेडीकल महाराणा प्रताप चौक, येथे अचानक पणे भेट दिली असता तेथे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय प्रतिबंधित औषधी विक्री व साठा करत असल्याचे मिळून आले आहे. सदर मेडीकल चालक यांच्या विरुद्ध कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे.

त्याच प्रमाणे दिनांक 21.07.2025 रोजी श्री.अ.तु.राठोड, सहा आयुक्त अन्न व औषध प्रशासन, विशेष पोलीस पथकातील पोउपनि/पंकज इंगळे यांनी पथकातील स्टाफसह श्री शंभु मेडिकल नृसिंह चौक, कौठा नांदेड येथे अचानक पणे भेट दिली असता तेथे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय प्रतिबंधित औषधी विक्री व साठा करत असल्याचे मिळून आले आहे. सदर मेडीकल चालक यांच्या विरुद्ध कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे.

त्याच प्रमाणे दिनांक 18.08.2025 रोजी श्री.अ.तु.राठोड, सहा आयुक्त अन्न व औषध प्रशासन, विशेष पोलीस पथकातील पोउपनि/पंकज इंगळे यांनी पथकातील स्टाफसह शिवकृपा एजन्सी अॅन्ड मेडिकल स्टोअर्स अॅटोस्टॉप वाजेगाव नांदेड नांदेड येथे अचानक पणे भेट दिली असता तेथे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय प्रतिबंधित औषधी विक्री व साठा करत असल्याचे मिळून आले आहे. सदर मेडीकल चालक यांच्या विरुद्ध कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे.

यापुर्वी अन्न व औषध प्रशासन नांदेड यांनी पोलीस प्रशासना सोबत समन्वय साधून नांदेड शहरातील 13 मेडिकल यांना अचानक भेटी दिल्या असता 11 मेडिकल मध्ये प्रतिबंधीत नशेच्या गोळ्या औषध हे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशन शिवाय विक्री व साठा करत असल्याचे मिळून आले असल्याने 05 मेडिकलचे परवाने रद्द केले व 06 मेडिकल यांचे परवाने 30 ते 60 दिवसांकरीता निलंबित करण्यात आले आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे. 1. न्यू भारत मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर्स, इतवारा 2. जोशी मेडिकल, जुना मोंढा 3. एस. आर. मेडिकल, अबचल नगर 4. साईबाबा

मेडिकल, लोहार गल्ली 5. अमेना मेडिकल, महेबुब नगर 6. पबितवार मेडिकल, गुरूव्दारा गेट क्र.02. 7. खालसा मेडिकल, गुरुव्दारा गेट क्र.01 8. न्यू लाहोटी मेडिकल, गुरुव्दारा गेट क्र.02 9. संचखंड मेडिकल, अबचल नगर 10. संत जिवन मेडिकल, नगिनाघाट 11. आशिर्वाद मेडिकल, चिखलवाडी कॉर्नर या मेडिकल वरती नमुद प्रमाणे कारवाई करण्यात आली असून अशा प्रकारे नशेच्या गोळ्या औषध हे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशन शिवाय विक्री व साठा करत असल्याचे मिळून आल्यास संबंधीतांवर अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासनाकडून संयुक्तरित्या कायदेशीर कारवाई करून परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

याद्वारे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, नांदेड जिल्ह्यामध्ये कोणत्याही औषधी मेडीकल तसेच इतर ठिकाणी नशेली प्रतिबंधीत औषधी गोळ्या (Tablet) विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या बाबत जवळच्या पोलीस स्टेशन अथवा वर नमूद विशेष पथकातील पोलीस अधिकारी पोउपनि पंकज इंगळे, मोबाईल क्र. 7972837836 यांना माहिती देण्यात यावी. अशी माहिती प्राप्त होताच त्या बाबत गंभिर दखल घेवून N.D.P.S.ACT प्रमाणे कठोर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल व आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल,

मा. श्रीअबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी लक्षात घेवून विविध कायद्याअंतर्गत गुन्हेगारावर प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन गुन्हेगारी कमी करण्यात मोठ्या मिळवीले आहे. नशेली औषधी गोळ्या (Tablet) तसेच इतर नशेली पदार्थाचे सेवनाने नवीन पिढी जावून त्यांचे आयुष्य उध्वस्त होवू नये या करीता सर्वोतोपरी प्रयत्न असून त्या सबंधाने कठोर कायदे करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!