जुगार विरोधी कारवाई दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांची कारवाई.”
मुख्य संपादिका महानंदा कासले

जुगार विरोधी कारवाई दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांची कारवाई.”
उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांचे पथक उमरगा उप विभागातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 08.07.2025 रोजी उमरगा तालुक्यात गस्तीस होते. मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव शेलार यांना गोपनीय माहिती मिळाली की, कवठा ता. उमरगा येथील लातुर जाणारे रोडलगत कवठा शिवारातील दयानंद सोनवणे यांचे शेतातील गोठ्या मध्ये काही इसम तिरट जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणच्या गोठ्यामध्ये 18.20 वा. सु. छापा टाकला असता तेथे शाम निशीकांत काळे, वय 32 वर्षे, समीर सर्फराज शेख, वय 21 वर्षे, रा. किल्लारी ता. औसा जि. लातुर, आकाश राम कदम, महेश मोहन काळे, वय 35 वर्षे, रा. माडज, किशोर बालाजी ननुरे, वय 34 वर्षे,, कैलास शेषेराव पुजारी, वय 35 वर्षे, रा. किल्लारी ता. औसा, गोपाळ पंड पंजारी, वय 45 वर्षे, रा. किल्लारी ता. औसा जि. लातुर, हबीब दस्तगीर सय्यद, वय 40 वर्षे, रा. शिरसल ता. औसा, दत्ता पुन्नु चव्हाण, वय 44 वर्षे, रा. होळी ता. लोहारा, जितेंद्र ज्ञानोबा काळे, वय 38 वर्षे, रा. उमरगा, विवेकानंद शंकरराव सोनवणे, वय 48 वर्षे, रा. कवठा ता. उमरगा, सचिन हरिदास गायकवाड, वय 32 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव हे सर्व लोक तिरट जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. पथकाने नमूद जुगार अड्ड्यावरुन जुगार साहित्यासह 03 कार, 09 मोबाईल फोन व रोख रक्कम 13,900 असा एकुण 17,58,690 ₹ किं था मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अंतर्गत उमरगा पो. ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या आदेशावरुन उमरगा उप विभागाचे श्री. सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या पथकाने केली आहे.