बाबा शेख गॅगचा सदस्य, मोक्का जेल रिलिज व तडीपार आरोपी कडुन ०२ पिस्टल व ०२ काडतुसासह गुन्हे शाखा, युनिट ४, पिंपरी चिंचवड यांनी घेतले ताब्यात
मुख्य संपादिका महानंदा कसले

बाबा शेख गॅगचा सदस्य, मोक्का जेल रिलिज व तडीपार आरोपी कडुन ०२ पिस्टल व ०२ काडतुसासह गुन्हे शाखा, युनिट ४, पिंपरी चिंचवड यांनी घेतले ताब्यात
मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड, श्री. विनय कुमार चौबे साो, यांनी सर्व पोलीस ठाणे आणि सर्व गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांना दिनांक १३/०८/२०२५ रोजी पासुन अवैद्ध अग्नीशस्त्र (आर्म ड्राईव्ह) बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार आमचे व सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ४ पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद पवार, पोउपनि मयुरेश साळुंखे, पोहवा/मोहम्मद गौस नदाफ, पोहवा/तुषार शेटे, पोशि/प्रशांत सैद, पोशि/सुखदेव गावंडे, पोशि/गोविंद चव्हाण असे गुन्हे शाखा युनिट-४ चे हद्दिमध्ये अबैद्ध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांबाबत माहिती काढत असताना वरील पथकास त्यांचे बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी नामे पवन बनेटी हा पिंपळे निलख परिसरात येणार असुन त्याचे कडे अवैद्ध अग्नीशस्त्र आहेत अशी बातमी मिळाली. तेव्हा वरील पथकाने आरोपी नामे पवन देवेंद्र बनेटी, वय-२४ वर्षे, रा- राजीव गांधी झोपडपट्टी, पिंपळे गुरव, सांगवी, पुणे यास दि. २७४/०८/२०२५ रोजी शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचे कडुन ०२ पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
आरोपी नागे पवन देवेंद्र बनेटी हा गोक्का जेल रिलिज व रेकॉर्ड वरील आरोपी असुन त्याचे विरुद्ध दोन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन त्यास पुणे जिल्हयातुन दोन वर्षा करिता तडीपार करण्यात आले आहे.
तसेच सदर आरोपी विरुद्ध सांगवी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- २०२५ आर्म अॅक्ट ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलग-३७ (१) (३) सह १३५, गहाराष्ट्र पोलीस अधिनियग १४२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे सो, सह पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आवाड सो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. शिवाजी पवार, सपोआ, गुन्हे-१ मा. श्री. विशाल हिरे, यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोउपनि भरत गोसावी, पोउपनि गयुरेश साळुंखे, सपोउपनि संजय गवारे, प्रविष्ण दळे, नितीन ढोरजे, पोहवा कृणाल शिंदे, पोहवा/सुरेश जायभाये, पोहवा तुषार शेटे, पोहवा/मोहम्मद गौस नदाफ, पोहवा/भाऊसाहेब राठोड, पोशि/प्रशांत सैद, पोशि/गोविंद चव्हाण, पोशि/सुखदेव गावंडे, पोशि/अमर राणे, पोशि/दिनकर आडे, पोशि/रवि पवार, पोशि धनंजय जाधव यांनी केली आहे.
(