
सोलापूर शहर पोलीस दलात फॉरेन्सीक व्हॅन दाखल.
सोलापूर शहर हद्दीमध्ये, दाखल होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा तपास अधिक सक्षम व वैज्ञानिक पध्दतीने होण्याकरीता, फॉरेन्सीक बाहनाचे मा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांचे हस्ते दि.२७/०८/२०२५ रोजी, लोकार्पण करण्यात आले.
गुन्ह्याच्या तपासात, तपासी अधिकारी व अंमलदारांना घडलेल्या गुन्ह्यातील पुरावा वैज्ञानिक पध्दतीने गोळा करुन, तो पुरावा आरोपी विरुध्द न्यायालयात सादर करता यावा, यासाठी फॉरेन्सीक वाहन सोलापूर शहर पोलीसांना पुरवण्यात आले आहे. सदर वाहनाचे उद्घाटन मा. श्री. एम राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांच्या हस्ते झाले. सदर वाहनामध्ये, घटनास्थळावरील भौतिक पुरावे शोधून, तो वापरणेसाठी ०६ किट आहेत. त्यामध्ये, ब्लड किट, एनडीपीएस किट, कास्टींग किट, फायर आर्म किट, सायबर किट, तसेच जनरल किटचा समावेश आहे. त्यामुळे आरोपी विरुध्द मा. न्यायालयात अधिक ठोस वैज्ञानिक पुरावे सादर करण्यात येणार आहेत. तसेच, नमुद वाहनासोबत, ०३ असिस्टंट केमीकल अॅनालायजर, ०३ सायंटीफिक असिस्टंट व ०२ चालक असा स्टाफ नियुक्त आहे.
सदर उद्घाटन प्रसंगी, मा. श्री. एम राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, श्री. गौहर हसन, पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय), श्री. विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, श्री. जालींदर गळये, सहायक पोलीस निरीक्षक (अंगुलीमुद्रा विभाग) व इतर पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.
पोलीस