शहर गुन्हे शाखेकडून, मोटार सायकल चोरीचे02 गुन्हे उघडकीस
मुख्य संपादिका महानंदातले

शहर गुन्हे शाखेकडून, मोटार सायकल चोरीचे02 गुन्हे उघडकीस
नई जिंदगी परिसरातुन एक एच. एफ. डिलक्स व एक सप्लेंडर प्लस अशा 02 मोटार सायकल चोरी झालेबाबत एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे येथे मोटार सायकल चोरीचे 02 गुन्हे दाखल झाले होते. सदरचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोउपनि अल्फाज शेख व त्यांचे तपास पथक यांनी मिळून, गोपनिय बातमीदारामार्फत, तसेच तांत्रीक माहीतीच्या आधारे तपास केला असता, सदरच्या 02 मोटार सायकल या विजय नगर भाग-2, मजरेवाडी, सोलापूर एका विधीसंघर्ष बालकाने चोरी केल्या असुन, त्या त्याच्या घरासमोर लावुन ठेवल्या असल्याची माहीती प्राप्त झाली. प्राप्त माहीतीच्या अनुषंगाने, विधीसंधर्ष बालक याचे विजयनगर येथील घराजवळ जावून पाहीले असता, तेथे एक एच.एफ. डिलक्स व एक स्पलेंडर अशा 02 मोटार सायकल लावलेल्या दिसुन आल्या. सदर विधीसंघर्ष बालकास त्याचे वडीलांचे समोर 02 मोटार सायकलबाबत विचारपूस केली असता, त्याने मौलाना आझाद चौक, नई जिंदगी, सोलापूर येथून एच.एफ.डिलक्स मोटार सायकल क्र. MH 13 CY 0563, तसेच सिध्देश्वर नगर भाग-2/3, नई जिंदगी, सोलापूर येथून स्पलेंडर मोटार सायकल क्र. MH 13 DD 0533 चोरी केली असल्याचे सांगितले.
त्यावरुन, 1) एच.एफ. डिलक्स मोटार सायकल क्र. MH 13 CY 0563 ही चोरीबाबत MIDC पोलीस ठाणे गु.र.नं. 756/2025 भा.न्या.सं. कलम 303 (2) प्रमाणे व (2) स्पलेंडर मोटार सायकल क्र. MH 13 DD 0533 ही चोरीबाबत MIDC पोलीस ठाणे गु.र.नं. 757/2025 भा.न्या.सं. कलम 303 (2) प्रमाणे दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणलेले. नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या 60,000/-रुपये किंमतीच्या 02 मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
सदरची कामगिरी, श्री.एम. राजकुमार, मा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर, श्री. राजन माने, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर, श्री. अरविंद माने, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, वसिम शेख, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, चालक सतिश काटे यांनी केली आहे.
Mlis पोलीस