07 लाख 09 हजार रुपये किमतीचे 71 किलो गांजाच्या झाडासह एक जण ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
मुख्य संपादक महानंदा कासले

07 लाख 09 हजार रुपये किमतीचे 71 किलो गांजाच्या झाडासह एक जण ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर जोरदार कार्यवाही करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात दिनांक 13/09/2025 रोजी पोलीस ठाणे किल्लारी अंतर्गत नांदुर्गातांडाच्या शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई करत नांदुर्गातांडा मधील शेत शिवारातील एका उसाच्या शेता मधून 07 लाख 09 हजार 900 रुपयांचा 70.99 किलो लागवड करण्यात आलेला गांजा ची झाडे जप्त करण्यात आली आहे.
औसा तालुक्यातील पोलीस ठाणे किल्लारी हद्दीमधील नांदुर्गा तांडा शेत शिवारातील उसाच्या शेतात गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याअधारे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, यांच्या नेतृत्वातील पथकाने नांदुर्गातांडा शिवारातील गांजाचे झाडे लावलेल्या उसाच्या शेतात छापा टाकून गांजाची 70.99 किलो वजनाची झाडे जप्त केली आहे.लावलेल्या उसाच्या शेतात छापा टाकून गांजाची 70.99 किलो वजनाची झाडे जप्त केली आहे.
या प्रकरणी पोलीस ठाणे किल्लारी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात शेतमालक नामे
1) बळीराम दगडू पवार, वय 60 वर्ष, राहणार नांदुर्गातांडा, तालुका औसा. याला अटक करण्यात आली आहे. त्याचा आणखीन एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे व औसा उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वात पथकातील, पोलिस निरीक्षक रेवनाथ डमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, विशाल शहाणे,
पोलीस उपनिरीक्षक मर्डे, शिंदे, पोलीस अमलदार अर्जुन रजपूत, दीनानाथ देवकते, साहेबराव हाके, मुबाज सय्यद, राहुल कांबळे, चंद्रकांत केंद्रे यांनी केली