करजखेडा दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपीस 24 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेडद्या.”
मुख्य संपादिका महानंदा कासले

करजखेडा दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपीस 24 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेडद्या.”
मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक), यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस ठाणे बेंबळी येथील अतिशय संवेदनशील अशा दुहेरी हत्याकांडातील आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेशीत केल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, पोह/ विनोद जानराव, नितीन जाधवर दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, राहुल नाईकवाडी, पोना/बबन जाधवर, अशोक इगारे, चापोह/विजय घुगे, महेबुब अरब असे पोलीस ठाणे गुरनं 209/2025 कलम 103, 3 (5) बीएनएस गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचा शोध घेणेकामी रवाना होवून गोपनिय बातमीदार नेमुन निष्पन्न आरोपी जिवन हरीबा चव्हाण, हरीबा यशवंत चव्हाण यांची माहिती घेत असताना पथकास गोपनिय बातमीदार यांचे कडुन माहिती मिळाली की, नमुद दोन्ही आरोपी हे पुणे येथे त्यांचे नातेवाईकाकडे गेले आहेत. त्यावरुन पथकाने सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांचे आदेशाने तात्काळ वरील नमुद स्टाफसह पुणे येथे जावून नमुद आरोपीचा शोध घेतला असता ते जनता वसाहत पर्वती पायथा पुणे येथे नातेवाईकाचे घरी असल्याची माहिती मिळाल्याने तेथे जावून अतिशय शिताफीने त्यांना ताब्यात घेवून त्यांना पुढील कार्यवाही कामी पोलीस ठाणे बेंबळी येथे हजर केले आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक), यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोह/ विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, राहुल नाईकवाडी, पोना/बबन जाधवर, अशोक ढगारे, चापोह/विजय घुगे, महेबुब अरब यांच्या पथकाने केली आहे.