मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र छत्रपती संभाजीनगर यांचे हस्ते अधिकारी व अमंलदार सत्कार.”
मुख्य संपादिका महानंदा कासले

“मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र छत्रपती संभाजीनगर यांचे हस्ते अधिकारी व अमंलदार सत्कार.”
दि.21.08.2025 रोजी मा. श्री वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था आणि पोलिसी कामकाजाबाबत आढावा घेतला. तसेच उत्कृष्ट कामगिरी बद्दल आढावा मीटिंग च्या वेळी श्री. निलेश देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर, सहा पोलीस निरीक्षक श्री. नामदेव मद्ये, पोलीस ठाणे तुळजापूर, पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र खांडेकर, सहा पोलीस निरीक्षक श्री तात्याराव भालेराव, पोलीस ठाणे तुळजापूर, पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, स्थानिक गुन्हे शाखा, सहा पोलीस निरीक्षक श्री. गणेश पाटील पोलीस ठाणे बेंबळी, सहा पोलीस निरीक्षक श्री. गोरक्षनाथ खरड पोलीस ठाणे अंबी, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनघा गोडगे, भरोसा सेल, श्रीमती पुनम ढोगरे, वरिष्ठ श्रेणी लिपीक पो. अ.का. धाराशिव, साप्फौ । देवेंद्रनाथ मारुती राऊत, भरोसा सेल, धाराशिव, पोलीस हावलदार डी. के. कवटे, ए. व्ही कंदले, अनैतिक मानवी वाहतूक कक्ष, धाराशिव यांचे प्रशस्ती पत्रक देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच मालाविषयक व शरीराविरुध्दचे उघडकीस न आलेले गुन्हे जास्ती जास्त प्रमाणात उघडकीस आणणे बाबत योग्य त्या सुचना दिल्या. आर्टीफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करुन गुन्ह्याच्या तपास कामी आरोपीच्या शोथ कामी योग्य तो वापर करप्पा बाबत सुचना दिल्या. तसेच अवैध धंद्यावर जास्तीत जास्त कारवाया करण्या बाबत सुचना दिल्या. तसेच आगामी काळातील सण उत्सवा निमीत्त पोलीस विभागाकडून करावयाच्या कर्तव्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. सदर मिटींगला मा. पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि धाराशिव पोलीस घटकातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
जनसंपर्क