क्राईम न्युज

एम. पी. डी. ए. पाहीजे आरोपीच्या येरवडा पोलीसांनी आवळल्या मुसक्या

मुख्य संपादिका महानंदात असले

एम. पी. डी. ए. पाहीजे आरोपीच्या येरवडा पोलीसांनी आवळल्या मुसक्या

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी इसम नामे विशाल शंकर सिंह, वय २१ वर्षे, रा. ओंकार गणेश मंदिराजवळ, गजानन सोरटे यांच्या रुममध्ये भाड्याने संगमवाडी, पुणे यास महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीची विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळूची तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम, १९८१ (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक रोमन ५५) (दुरूस्ती १९९६) (दुरूस्ती २००९) (दुरूस्ती २०१५) अन्वये दिनांक ०८/०४/२०२५ रोजी स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले होते. तसेच नमूद इसमास स्थानबध्द करून नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे स्थानबध्द करण्यात यावे असे नमुद करण्यात आले होते. परंतु सदर इसम हा मागील ०४ महीन्यापासुन पसार झालेला होता.

दि. २२/०८/२०२५ रोजी २०/०० वा. पोलीस शिपाई / १०७४९ अमोल गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, विशाल शंकर सिंह, वय २१ वर्षे, रा. ओंकार गणेश मंदिराजवळ, गजानन सोरटे यांच्या रुममध्ये भाड्याने संगमवाडी, पुणे हा शिवाजीनगर, पुणे येथे येणार आहे. त्यानंतर सदर बातमी त्यांना पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे यांना सांगितली. त्यानंतर सदर बातमी पोउपनि महेश फटांगरे यांनी वपोनि येरवडा पोलीस स्टेशन यांना सांगुन पोउपनि महेश फटांगरे व सोबत पोलीस शिपाई / १०७४९ अमोल गायकवाड, पोलिस हवालदार / ८२७३ विशाल निलख असे रवाना शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्दीतुन जावन तेथे इसम नामे विशाल शंकर सिंह, वय २१ वर्षे, रा. ओंकार गणेश मंदिराजवळ, गजानन सोरटे यांच्या रुममध्ये भाड्याने संगमवाडी, पुणे यास ताब्यात घेऊन एमपीडीए आदेशाची बजावणी करुन त्याची रवानगी नागपुर मध्यवर्ती कारगृह येथे करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी श्री. अमितेश कुमार साो. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. रविंद्र शेळके, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन, श्रीमती पल्लवी मेहेर, पोनि गुन्हे, श्री. विजय ठाकर, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली निगराणी पथकाचे पोउपनि महेश फटांगरे, पोलीस हवालदार / ७५३३ सचिन शिंदे, पोलिस हवालदार / ८२७३ विशाल निलख, मपोशि / ११०३५ मोनिका पवार, पो शि / १०७४९ अमोल गायकवाड यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!