लातूर जिल्हा पोलीस दलाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, जिल्हाभरात रूट मार्च चे आयोजन
मुख्य संपादिका महानंदा कासले

लातूर जिल्हा पोलीस दलाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, जिल्हाभरात रूट मार्च चे आयोजन
आगामी गणेश उत्सव व ईद-ए-मिलादुन्नबी च्या पार्श्वभूमीवर, लातूर पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यातील संभाव्य धोके व गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी लातूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात आला. ‘सुरक्षित लातूर’ उपक्रमांतर्गत आयोजित रूट मार्चद्वारे पोलिसांचा उद्देश गणेशोत्सवात व ईद-ए-मिलादुन्नबी मध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये. लातूर पोलिसांची सज्जता दर्शवणे आणि नागरिकांना शांततापूर्ण व सुरक्षित वातावरणात उत्सव साजरा करता यावा हे सुनिश्चित करणे हा असून गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी आणि उत्साह यावर लक्ष ठेवून शांतता व सुव्यवस्था राखून संभाव्य गुन्हेगारी किंवा अनुचित घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि तत्काळ कार्यवाही करण्यासाठी पोलिसांची सज्जता दर्शवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवणे आणि गणेशोत्सवाचा व आगामी ईद-ए-मिलादुन्नबी च्या आनंद सुरक्षितपणे घेता यावा यामागचा उद्देशलातूर पोलिसाकडून सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात येते की, गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासारख्या सुरक्षा उपायांना प्रोत्साहन द्यावे जेणेकरून कोणत्याही घटनेची वेळीच दखल घेतली जाईल.
तसेच हा रूट मार्च लातूर पोलिसांच्या ‘आपले लातूर सुरक्षित लातूर’ या मोठ्या उपक्रमाचा एक भाग असून ज्याचा उद्देश शहरातील आगामी सन उत्सव सुरक्षित व निर्विघ्नपणे पार पाडावे हे आहे. या उपक्रमांतर्गत लातूर पोलिसांकडून गणेश मंडळांनाही सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
सदर रूट मार्चमध्ये जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता.