गाडीचा हप्ता भरण्यासाठी साथीदारा सोबत केली तारे ची चोरी त्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक.” “पवनचक्की चे अॅल्युमिनियम तार चोरीचे एकूण सहा गुन्हे उघड.”
मुख्य संपादिका महानंदा कसले

“गाडीचा हप्ता भरण्यासाठी साथीदारा सोबत केली तारे ची चोरी त्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक.” “पवनचक्की चे अॅल्युमिनियम तार चोरीचे एकूण सहा गुन्हे उघड.”
दिनांक 21/08/2025 रोजी माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे पेट्रोलिंग करत असताना पथकास गोपनीय बातमीवरून संशयित आरोपी नामे विशाल रामा काळे वय 21 वर्ष रा. पारधी पिढी भुम, जिल्हा धाराशिव याच्याकडे चोरीचा मुद्देमाल असुन सदर मुद्देमाल तो विक्रीकरिता घेऊन जाणार आहे. अशी बातमी मिळाल्यावर सदर आरोपीस त्याचे पिकअप सह सिताफिने ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याचे वाहनात अल्युमिनियम तारेचे बंडल असल्याचे दिसून आले त्याचे कडे सदर बाबत चौकशी केली असता त्याने सदरच्या अॅल्युमिनियम च्या तारा कळंब व वाशी तालुक्यातील बावी, सरमकुंडी, मस्सा शिवारातून पवनचक्कीच्या खांबांवरून चोरी केलेल्या असल्याची कबुली दिली त्यावरून धाराशिव जिल्हा गुन्हे अभिलेख तपासला असता अशा प्रकारच्या चोरीचे 06 गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. त्यावरून तात्काळ पंचनामा करून एकूण 898 मीटर लांबीच्या 02,69,400 रुपये किमतीच्या अॅल्युमिनियमच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन किंमत 5,00,000 रुपये असा एकूण 07,69,400 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याच्या अन्य साथीदारांची नावे तसेच चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत माहिती दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या अॅल्युमिनियम तारा चोरीचे एकूण 06 गुन्हे उघडकीस आले आहेत. ताब्यात असलेल्या आरोपीने त्याच्या अन्य साथीदाराच्या मदतीने सदरचे गुन्हे केल्याचे कबुली दिल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सह पोलीस ठाणे, वाशी येथे पुढील कारवाई कामी हजर केले आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हावलदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फराहान पठाण, चालक पोलीस अमंलदार रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे.
जनसंपर्क