
शहर गुन्हे शाखेकडून, मोटार सायकल चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस.
अ) गुन्हे शाखेकडील पोउपनि अल्फाज शेख व त्यांचे तपास पथक मिळुन, सोलापूर शहरामधील रेकॉर्डवरील आरोपींना चेक करत असताना, दि.३०/०८/२०२५ रोजी, गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ‘एक संशयीत इसम चोरी केलेल्या ०२ मोटार सायकल घेवून, विक्रीकरिता स्व. लिंगराज वल्याळ मैदान, सोलापूर येथे थांबला आहे.” सदर बातमीचा आशय वरिष्ठांना कळवुन, त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे बातमीचे ठिकाणी जावुन, इसम नामे- अयान सैफन मुछाले, वय २० वर्षे, रा. घर नं. ३४६, राहुल गांधी झोपडपट्टी, मुस्लीम पाच्छा पेठ, सोलापूर यास ताब्यात घेतले. त्यावेळी, सदर इसमाच्या ताब्यातुन विना नंबरप्लेटची एक यामाहा कंपनीची RX १०० व होंडा कंपनीच्या युनिकॉर्न मोटार सायकल अशा एकूण ०२ मोटार सायकल मिळून आल्या.
त्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता, यातील यामाहा कंपनीची RX १०० मोटार सायकल ही मार्च २०२५ मध्ये बागवान यांचे किराणा दुकानाचे शेजारी, भगतसिंग चौक, मुस्लीम पाच्छा पेठ, सोलापूर येथुन चोरी केलेली आहे. सदरची मोटार सायकल ही चोरी केली त्यावेळी, ती सिल्व्हर कलरची होती. सदरची मोटार सायकल ओळखु येवु नये म्हणुन, त्याने, मोटार सायकलला काळा कलर दिल्याचे सांगितले. तसेच, होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटार सायकल ही, मार्च २०२५ मध्ये, कन्ना चौक, सोलापूर येथून चोरी केल्याचे सांगितले. त्यावरुन, मोटार सायकल चोरीचा अभिलेख पडताळला असता (१) यामाहा कंपनीची RX १०० चा RTO क्र. MP ११११२५ ही मोटार सायकल चोरीस गेलेबाबत, जेलरोड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४४५/२०२३ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) व (२) युनिकॉर्न मोटार सायकल RTO क्र. MH १३ AY ६७८९ ही मोटार सायकल चोरी गेलेबाबत जेलरोड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४०५/२०२३ भा.न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले. अशा प्रकारे, सदर इसमाकडून, ७०,००० रुपये किंमतीच्या ०२ मोटार सायकल जप्त करुन ०२ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ब) तसेच एक संशयित इसम महालक्ष्मी मंदीर ते मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रोडवर, सोलापूर येथे चोरीची मोटार सायकल विक्रीकरिता घेवून थांबला आहे. अशी गोपनिय माहिती प्राप्त झाली. प्राप्त बातमीचा आशय वरिष्ठांना कळवुन, त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे बातमीचे ठिकाणी जावुन, इसम नामे शेखर संभाजी जाधव, वय २५ वर्षे, सध्या रा. मु.पो. मोधा, ता. उदगिर, जि. लातुर, कायम रा. गवळी चाळ, चक्रपाणी वसाहत रोड, भोसरी, पुणे – ४११०३९ यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातुन विना नंबरप्लेटची एक हिरो कंपनीची स्पलेंडर मोटार सायकल मिळुन आली. त्याबाबत नमूद इसमाकडे विचारपूस केली असता, सदरची मोटार सायकल ही, दि.२६/०८/२०२५ रोजी, साखर पेठ, सोलापूर येथून चोरी केली असल्याचे सांगितले. त्यावरुन मोटार सायकल चोरीचा अभिलेख पडताळला असता हिरो
कंपनीची स्पलेंडर क्र. MH 13 DB 9744 या मोटार सायकल चोरीबाबत जेलरोड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४४६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले. यावरुन सदर इसमाने मोटार सायकल चोरीचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने, २०,००० रुपये किंमतीची मोटार सायकल जप्त करुन ०१ गुन्हा उघडकीस आणला आहे.
अशा प्रकारे, शहर गुन्हे शाखेकडील पोसई/अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकाने, वरील नमूद दोन्ही इसमांकडून, मोटार सायकल चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस येवून, एकूण ९०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी, श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे/वि.शा., श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकाती अंमलदार बापू साठे, वसिम शेख, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, सायबर पोलीस प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.