उदगीर तालुक्यातील मटका गँग लातूर जिल्ह्यातून तडीपार (हद्दपार). अवैध धंद्यांशी निगडित व्यक्तींवर कठोर कारवाईचे पोलीस अधीक्षकांचे आदेश
मुख्य संपादिका महानंदा काचले

उदगीर तालुक्यातील मटका गँग लातूर जिल्ह्यातून तडीपार (हद्दपार). अवैध धंद्यांशी निगडित व्यक्तींवर कठोर कारवाईचे पोलीस अधीक्षकांचे आदेश
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्यातील मटका जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या लोकाविरुद्ध मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करून मटका जुगार चालवणाऱ्या वर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. परंतु काही मटका जुगार चालविणाऱ्यांवर वेळोवेळी गुन्हे दाखल करून व प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही त्यांच्यात काहीच सुधारणा होत नाही. ते लपूनछपून मटका जुगार चालवीत असताना परत मिळून आले. त्यांच्या अशा कृत्यामुळे समाजातील गोरगरीब जनता, मजदूर वर्ग झटपट पैसे कमविण्याच्या आमिषाला बळी पडत आहेत. जुगारांमध्ये पैसे हारल्याने त्यांच्या कौटुंबिक जीवनावर व मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन अनेक जनामध्ये नैराश्य निर्माण होऊन ते व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
काही मटका जुगार चालविणारे लोक त्यांच्यावर वारंवार गन्हे दाखल होऊनही
त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल होऊनही व प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही परत लपून-छपून मटका जुगार चालवीत आहेत त्यांच्या वर्तनामध्ये काहीच फरक पडत नाही याची गंभीर दखल घेऊन मा. पोलीस अधीक्षक लातूर यांनी जिल्ह्यातील मटका जुगार चालवणाऱ्या वर हद्दपारची कार्यवाही करण्याकरिता ठाणे प्रभारींना आदेशित केले होते. त्यावरून उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस ठाणे हद्दीतील मटका जुगार चालवणाऱ्या इसमाविरुद्ध हद्दपारचा सविस्तर प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी उदगीर सुशांत शिंदे यांच्याकडे पाठविला होता. त्यावर नमूद प्रकरणाची सुनावणी होऊन उपविभागीय दंडाधिकारी यांनी खालील नमूद अनुक्रमांक एक ते दोन यांना तीन महिन्यासाठी तर अनुक्रमांक तीन ते आठ यांना दोन महिन्यासाठी लातूर जिल्ह्यातून तडीपार (हद्दपार) ची कार्यवाही केली आहे.
1) अहमद सुरज शेख रा. वाढवणा बु. ता. उदगीर
2) सोहेल मुजमील शेख रा. हाळी ता. उदगीर
3) क्रांतीकुमार शिवाजी जोंधळे रा. वाढवणा बु. ता. उदगीर
4) विक्रम विनोद शिंदे रा.हाळी ता. उदगीर
5) फिरोज चॉदसाब शेख रा. वाढवणा ता. उदगीर6) अजय अनिल कज्जेवाड रा. वाढवणा बु.ता.उदगीर
4G
7) अलिम आयुबसाब डांगे रा. वाढवणा बु. ता. उदगीर
8) तुकाराम रामकिशन पुंड रा. वाढवणा बु.ता.उदगीर
नमूद इसमाना लातूर जिल्ह्याच्या बाहेर नेऊन सोडण्यात आले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर श्री कल्याणकर साहेब यांचे मार्गदर्शनात वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एस गायकवाड यांनी नमूद लोकाविरुद्ध सविस्तर हद्दपार प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी उदगीर यांच्याकडे पाठविले होते. त्याचा पाठपुरावा उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व वाढवना पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड यांनी केला त्यावर सदर प्रस्तावांचे अवलोक व सुनावणीअंती उपविभागीय दंडाधिकारी उदगीर सुशांत शिंदे यांनी नमुद लोकाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 57 प्रमाणे कार्यवाही करून त्यांना लातूर जिल्ह्यातून तडीपार (हद्दपार) केले आहे.
सदर कारवाईच्या माध्यमातून अवैध धंदे चालविणारे लोकांना लातूर जिल्ह्यातून तडीपार (हद्दपार) केल्यामुळे अवैध धंद्यांना प्रतिबंध बसणार असून अवैध धंदे करणाऱ्यांना7) अलिम आयुबसाब डांगे रा. वाढवणा बु. ता. उदगीर
8) तुकाराम रामकिशन पुंड रा. वाढवणा बु.ता.उदगीर
नमूद इसमाना लातूर जिल्ह्याच्या बाहेर नेऊन सोडण्यात आले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर श्री कल्याणकर साहेब यांचे मार्गदर्शनात वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एस गायकवाड यांनी नमूद लोकाविरुद्ध सविस्तर हद्दपार प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी उदगीर यांच्याकडे पाठविले होते. त्याचा पाठपुरावा उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व वाढवना पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड यांनी केला त्यावर सदर प्रस्तावांचे अवलोक व सुनावणीअंती उपविभागीय दंडाधिकारी उदगीर सुशांत शिंदे यांनी नमुद लोकाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 57 प्रमाणे कार्यवाही करून त्यांना लातूर जिल्ह्यातून तडीपार (हद्दपार) केले आहे.
सदर कारवाईच्या माध्यमातून अवैध धंदे चालविणारे लोकांना लातूर जिल्ह्यातून तडीपार (हद्दपार) केल्यामुळे अवैध धंद्यांना प्रतिबंध बसणार असून अवैध धंदे करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला असून अवैध धंदे करणाऱ्यांना चांगला जरब बसणार आहे