अळकुटी ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी वार्डनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर अळकुटीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. ५ वार्डमधील १३ सदस्य पदांसाठी निवडणूक होणार असून अनेक इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मोर्चे बांधणी सुरू केली आहे. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार वार्ड क्रमांक १ मध्ये १ सर्वसाधारण महिला, २ सर्वसाधारण पुरुष , वार्ड क्रमांक २ मध्ये एस सी महिला , नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष व सर्वसाधारण महिला , वार्ड क्रमांक ३ मध्ये एक – ओबीसी महिला व एक सर्वसाधारण महिला , एक सर्वसाधारण पुरुष , वार्ड क्रमांक ४ मध्ये एक ओबीसी महिला , एक सर्वसाधारण पुरुष , तर वार्ड क्रमांक ५ मध्ये एक सर्वसाधारण महिला व एक सर्वसाधारण पुरुष , अशा ५ वार्डमध्ये १३ जागांचे आरक्षण निश्वित करण्यात आले आहेत. सरपंच पद हे खुल्या प्रवर्गातील सर्वांसाठी खुले झाल्याने गावातील अनेक पुरुष नेते कामाला कामाला लागले असून साम , दाम , दंड व भेद वापरून कसल्या ही परिस्थिती त सरपंच पद काबिज करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत . या मध्ये प्रामुख्याने राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री स्वामी समर्थ देवस्थान चे अध्यक्ष सुभाषराव भोसले , भाजपाचे अहिल्यानगर जिल्हा चिटणीस अतुल माने , भाजपाचे अळकुटी – निघोज मंडलाध्यक्ष किसनराव शिंदे , माजी सरपंच सखाराम उजागरे , सहकार क्षेत्रात काम करणारे सुभाष पुंडे , कोरठण खंडोबा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष महेश शिरोळे , सामाजिक कार्यकर्ते सुदाम शिरोळे , माजी उपसरपंच बाळासाहेब धोत्रे व इतर इच्छुक वेगाने कामाला लागले आहेत .या निवडणूकीत पदावर नसताना ही वा पदावर असताना ज्यांनी विकास कामे आपापल्या ताकदीने केली , अशाच व्यक्तीं कडे मतदारांचे लक्ष असून अशा नेत्यांनाच आपले प्रतिनिधी म्हणून निवडून देणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली .
सरपंच पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी , जनतेतून थेट निवड यंदाच्या निवडणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे सरपंच पदासाठी खुल्या प्रवर्गातून थेट जनतेतून सरपंच पदासाठी निवड होणार आहे. त्यामुळे सरपंच पदाच्या शर्यती चे अनेकांना वेध लागले असून इच्छुकांनी गत वर्षांपासूनच तन , मन व धनाने मतदारांशी संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे.
अळकुटीतील राजकीय वर्तुळात यंदाची निवडणूक ही ३ पॅनेल मध्ये सरळ व अटीतटीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिन्ही पॅनलस कडून उमेदवारांची जुळवाजुळव व प्रचाराची रणनीती आखणीला या सदस्य आरक्षणाने वेग आला आहे.
गावाच्या विकासावर लक्ष केंद्रीत होणार ? निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच , गावातील राजकीय घडामोडींना वेग आला असून गावातील विकासकामे, पाणी, रस्ते, स्वच्छता आणि इतर प्रश्नांवर यंदाची ग्रामपंचायत निवडणूक केंद्रित राहणार की गट-तटाचे राजकारणाकडे वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे काय ? ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधींची ही लोकशाही प्रक्रिया होय. ]
मतदान का महत्वाचे ? आपले एक मत गावाचा विकास घडवू शकते. जबाबदार नागरिक म्हणून आपले ते कर्तव्यच आहे .मतदान करणे , ही आपली जबाबदारी आहे , नव्हे तर घटनेने दिलेला अधिकार आहे .
आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार असून नव्या नेतृत्वाचा उदय होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे . त्यासाठी सकारात्मक पद्धतीने व जात-पात, वैयक्तिक मतभेद विसरुन विकासाच्या मुद्द्यावर एकजुटीने ग्रामपंचायत निवडणूक पार पाडूया. ]