आमदार मा. श्री. प्राजक्तदादा तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर -मनमाड रस्त्याच्या कामाबाबत विशेष बैठक संपन्न झाली.या बैठकीत रस्त्याच्या कामाच्या पुढील नियोजन, सद्यस्थितीचा आढावा आणि आवश्यक निर्णय प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष मा. श्री. भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष मा. श्री. गजानन सातभाई, सर्व नगरसेवक, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेच्या सोयीसाठी आणि परिसराच्या विकासासाठी नगर – मनमाड रस्त्याच्या कामाला गती देण्याचा निर्धार आमदार प्राजक्ता दादा तनपुरे यांनी घेतला आहे.