इंदापूर – महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य च्या “महाराणी अहिल्यादेवी समाज महिला प्रबोधन मंच, पुणे विभागीय अध्यक्ष” पदी मा. सौ. अनिताताई नानासाहेब खरात यांची निवड. करण्यात आली आहे.आज पुणे विभाग(पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ) कार्यक्षेत्र यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सर्व समाजांना बरोबर घेऊन नेहमीच सातत्यपूर्ण सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या सर्व गोरगरीब अनाथ वृद्ध महिला विद्यार्थी शेतकरी यांच्या हाकेला धावून जाणाऱ्या इंदापूर येथील अनिताताई खरात यांच्याकडे पुणे कार्यक्षेत्रातील पाच जिल्ह्यांची जबाबदारी चे पत्र डॉक्टर जे पी बघेल यांनी अनिताताई खरात यांना दिले .अनिताताई खरात यांच्या सामाजिक कार्याला यामुळे अजून जास्तीचे बळ मिळणार आहे.
या वेळी अनिता खरात म्हणाल्या की सर्व समाजांना सर्व जातींना सर्व घटकांना बरोबर घेऊन आजपर्यंत मी काम करत आले आहे आणि इथून पुढे ही सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन मी माझे काम समाजाच्या हितासाठी गोरगरिबांच्या प्रगतीसाठी विद्यार्थी महिला अनाथ वृद्ध यांच्या प्रगतीसाठी नक्कीच माझ्या पदाला शोभेल असे काम मी करेन.