इंदापूर- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २७ वा वर्धापन दिन इंदापूर शहरात उत्साहात साजरा. इंदापूर पोलीस स्टेशनसमोरील शहर पक्ष कार्यालयात सकाळी ठीक ८:०० वाजता आयोजित करण्यात आला होता.या वर्धापन दिनानिमित्त इंदापूर तालुका आणि शहरातील पक्षाचे सर्व पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष, महिला आघाडी, युवक कार्यकर्ते आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष अँड.तेजसिंह पाटील, तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे, महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर, आस्माताई गणीभाई मुलाणी, शहराध्यक्षा रेश्मा ताई शेख, आणि शहराध्यक्ष अँड. ईनायत अली काझी उपस्थित होते. तसेच सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष संजय दुपारगुडे, बारामती लोकसभा युवक कार्याध्यक्ष अक्षय कोकाटे, आसमा मुलानी, विकास खिलारे, श्रीकांत पवार, विकास चितारे, भारत जगताप, पुष्पराज जमदाडे आणि शिवाजी गायकवाड यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.