कृष्णकृपांकित डॉ .विकासानंद महाराज मिसाळ यांनी केले धोंडे कार्यक्रमाचे महत्व विषद .
पारनेर प्रतिनिधी :सुरेश खोसे पाटील

धार्मिक , आध्यात्मिक व समाजातील सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि परंपरा जपण्यासाठी राज्यभर संत पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव वाघा येथे कृष्णकृपांकित , प्रसिद्ध भागवताचार्य हभप डॉ . विकासानंद महाराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक धोंडे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती हभप दत्तात्रय महाराज कारले यांनी दिली .
या कार्यक्रमात पिंपळगाव वाघा व नगर , पारनेर , जुन्नर , नेवासा , शिरूर , श्रीगोंदा तालुक्या सह , राज्यातून धार्मिक , आध्यात्मिक , सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे समाजबांधव, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . या कार्यक्रमाचे आयोजन संत पंढरीतील सेवेकरी भक्त व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे . धोंडे हा पारंपरिक उपक्रम असून ग्रामीण भागात त्याला विशेष महत्त्व आहे. ज्वारी, बाजरी किंवा गव्हाच्या पिठापासून तयार केलेले धोंडे आणि त्यासोबत आमरस , पुरण पोळी, गुळवणी ,भात ,आमटी , भजे , कुरडई अशा मेजवाणी चे आयोजन केले होते . पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या या धोंडा जेवणामुळे जुन्या खाद्य संस्कृतीची आठवण ताजी होती , असे मत हभप राजेश्वरानंद महाराज कु-हे यांनी व्यक्त केले .कृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव वाघा येथे संत पंढरी या भव्य प्रकल्पाची उभारणी करण्यात येत असून त्या अनुषंगाने त्यावर चर्चा , विचारमय करण्यात आले व राज्यभरातून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महिन्यातून एक दिवस हरी सत्संग व डॉ . मिसाळ महाराजांचे हरी प्रवचन ठेवण्यात येणार आहे . या धोंडे जेवणाच्या सामूहिक उपक्रमांमुळे आधात्मिक व धार्मिक एकोपा वाढतो, परस्पर सहकार्याची भावना दृढ होते आणि नव्या पिढीला आपल्या परंपरांची ओळख होते, यावेळी स्वयंपाकाची जबाबदारी महिलां बरोबरच पुरुष सेवेकऱ्यांनी अगदी मनोभावे सांभाळली , तर युवकांनी नियोजन, पार्किंग व्यवस्था आणि पाहुण्यांचे स्वागत यामध्ये सक्रिय सहभाग घेतला . यासाठी राज्यभरातून आलेल्या सर्वच भाविक भक्तांनी एकत्रित येत हा धोंडे जेवणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली . त्यामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती हभप श्यामसुंदर महाराज नाणेकर यांनी दिली .

श्रीमद् भागवत कथा व हरी किर्तनांच्या माध्यमातून प्रसिद्ध असलेले आणि राज्यातील धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातील सुंदर व नेत्रदिपक प्रकल्प श्रीक्षेत्र पिंपळगाव वाघा येथे कृष्णकृपांकित हभप डॉ विकासानंद महाराज मिसाळ यांनी ‘ तो गा मी निरुपाधिकु ॥ क्ष ॥ राक्षरोत्तमु एक । म्हणोनी म्हणे वेद लोकु पुरुषोत्तमु ॥ या ओवी चा संदर्भ घेत त्यांनी या सुरू असलेल्या धोंड्याच्या कार्यक्रमाचे महती सांगत , या महिन्यात करावयाची साधना , त्याचे नियम याचे महत्व सांगितले . तर लक्षणां मधील स्वरूप न तटस्थ या लक्षणांची माहिती सांगत श्रवण भक्ती ही उध्दार व ज्ञानाने होते , तर नामजप , ध्यानाचे प्रकार व अनुष्ठाण कसे करावे , याचे सविस्तर विवेचन डॉ . मिसाळ महाराज यांनी केले .

संत पंढरीचे निर्माते , कृष्णकृपांकित हभप डॉ . विकासानंद महाराज मिसाळ यांच्या संकल्पनेतून पिंपळगाव वाघा येथील संत पंढरी येथे विविध देवतांचे मंदीरे , गुरुकुल व धार्मिक , आध्यात्मिक क्षेत्रातील मोठा प्रकल्प लोक वर्गणी व लोकसहभागातून साकारत असून वर्षभर राज्यभरातून भाविक भक्त सह परिवार भेट देतात , त्यामुळे नजिकच्या येथे धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मोठे शैक्षणिक केंद्र उभे राह राहत आहे.
